कोपरगावमध्ये दुपारी 1 वाजेपर्यंत 33 टक्के मतदान उत्स्फूर्त प्रतिसाद
शिर्डी लोकसभा मतदारसंघात सकाळी धिम्या गतीने मतदान सुरू दिलेल्या दहा वाजे नंतर चांगला वेग घेतला दुपारी तीन वाजेपर्यंत टक्के मतदान झाले होते. महाआघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे, महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे व वंचित आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते यांनी मतदानाचा हक्क बजावला.
शिर्डीमध्ये तिरंगी लढत होत आहे. महाआघाडीचे भाऊसाहेब वाकचौरे व महायुतीचे सदाशिव लोखंडे यांनी शिर्डी शहरातील मतदान केंद्रावर सहकुटुंब मतदान केले. वंचितच्या ऊत्कर्षा रुपवते यांनी त्यांच्या अकोले शहरातील केंद्रावर हक्क बजावला.
माहेगाव देशमुख येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या निवडणूक केंद्रात आ.आशुतोष काळे व काळे परिवार यांनी मतदानाचा हक्क बजावला.
कोल्हे वस्ती शाळामतदान केंद्र 47 येथे माजी आमदार स्नेहलता कोल्हे व संपूर्ण कोल्हे परिवाराने मतदानाचा हक्क बजावला
सकाळी नऊ वाजेपर्यंत कोपरगाव येथे 5.11, टक्के मतदान नोंदवले गेले.
सकाळी 11 वाजेपर्यंत कोपरगाव येथे 19 टक्के मतदान नोंदवले गेले.
दुपारी 1 वाजेपर्यंत कोपरगाव येथे 32.85 टक्के, मतदान नोंदवले गेले.
अशी माहिती कोपरगाव विधानसभा संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी बालाजी क्षीरसागर यांनी दिली.
मतदान सुरू असताना रवंदा मतदान केंद्र 9 व ब्राह्मणगाव मतदान केंद्र 43 या ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच व्हिव्हीपॅट बंद पडले होते. तर तर दुपारी संवत्सर येथील बिरोबा चौकातील मतदान केंद्र 75 नंबर मतदान केंद्रावर व्हिव्हीपॅट अर्धा तास बंद पडले. अशी माहिती सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार संदीप कुमार भोसले यांनी दिली.
कोपरगाव मध्ये शिवसैनिकात प्रचंड उत्साह दिसून येत होता.सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास उमेदवार सदाशिव लोखंडे कन्या विद्यामंदिर येथील मतदान केंद्रावर आले असताना येथील शिवसेनेने सैनिकांनी मशाल मशाल अशी जोरदार घोषणाबाजी केल्याने लोखंडे यांनी काढता पाय घेतला
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List