मालिकेच्या सेटवर बिबटय़ाची एंट्री; फिल्मसिटीमधील घटना
‘प्रेमास रंग यावे’ या मालिकेच्या गोरेगावच्या फिल्मसिटी येथील सेटवर चक्क बिबटय़ाने एंट्री केल्याची धक्कादायक घटना घडली. परवा रात्री तीन वाजल्याच्या सुमारास ही घटना घडली, सुदैवाने त्यावेळी सेटवर कोणीच उपस्थित नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र, बिबटय़ाच्या येण्याने कलाकारांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
मालिकेच्या सेटवरील सीसीटीव्ही फुटेज सध्या व्हायरल होत आहेत. यात भक्ष्याच्या शोधात असलेला बिबटय़ा सेटवर बिनधास्तपणे वावरताना दिसतोय. दरम्यान, मालिकेच्या इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडीओ शेअर करत म्हटलेय, ‘बिबटय़ालादेखील ‘प्रेमास रंग यावे’ मालिकेची भुरळ पडली. अक्षरा आणि सुंदरला भेटायला डायरेक्ट सेटवर एंट्री. लोकप्रिय मालिकेचे नुकतेच 400 भाग पूर्ण झाले आहेत. त्यामुळे मालिकेच्या सेटवर अभिनंदन करण्यासाठी बिबटय़ाचे आगमन…’ ‘बिबटय़ा सेटवर आलेला नाही, तर त्यांच्या जागेवर सेट तयार केलाय, त्यांची घरं आपणच नष्ट केली, असे म्हणत काहींनी संताप व्यक्त केला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List