मुंबईसह नवी मुंबई, ठाण्यात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात; अवकाळीनं झोडपलं
गेल्या दोन दिवसांपासून पुणे, नाशिकला पावसानं झोडपल्यानंतर आता मुंबईसह नवी मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसानं नागरिकांची तारंबळ उडाली आहे. काही सखल भागात पाणी तुंबायला लागलं असून लोकांना त्यातून मार्ग काढावा लागत आहे. तर वादळी वाऱ्यामुळे काही भागात झाडांच्या फांद्या तुटून रस्त्यावर पडल्याचं पाहायला मिळत आहे. अद्याप वाहतूकीवर काही परिणाम झाल्याच पाहायला मिळत नसलं तरी असाच पाऊस सुरू राहिला तर नागरिकांना ऑफिसातून परतताना अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पावसामुळे वातावरणात गारवा आल्यानं मुंबई-ठाणेकरांची उकाड्यातून काही काळसाठी सुटका झाली आहे.
मुंबईसह कोकणात अवकाळी पावसाची शक्यता; विदर्भ, मराठवाड्यात गारपीटीचा अंदाज
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List