लूटालूट! उद्या संजय राऊत करणार नाशिक महानगरपालिकेतील 800 कोटींच्या घोटाळ्याची पोलखोल
मिंधे सरकारने नाशिक महापालिकेच्या हद्दीत 800 कोटी रुपयांचा भूसंपादन घोटाळा केल्याचा सनसनाटी आरोप शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी 5 मे रोजी केला होता. उद्या म्हणजेज 13 मे रोजी संजय राऊत पत्रकार परिषद घेऊन या घोटाळ्याची सर्व पोलखोल करणार आहेत. राऊत यांनी ‘एक्स’ या समाजमाध्यमावरून ही माहिती दिली आहे.
”विकासासाठी नाशिक दत्तक घेतो अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी 2017 ला केली होती. त्याचे पुढे काय झाले? लुटा लूट! भूसंपादन घोटाळा 800 कोटींचा. एकनाथ शिंदे व त्यांचे बिल्डर साथीदार या घोटाळ्यातील लाभार्थी आहेत. उद्या सकाळी 9.30 वाजता अधिक बोलू, असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडालेला असतानाच संजय राऊत यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावरून मिंधे सरकारवर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी ‘एक्स’वर एक पोस्ट शेअर करत बॉम्ब टाकला असून मिंधेंची झोप उडवणारी ही पोस्ट आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List