बारामतीच्या ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँग रुमचे सीसीटीव्ही फूटेज बंद पडणे ही गंभीर घटना; सुप्रिया सुळेंकडून संताप व्यक्त

बारामतीच्या ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँग रुमचे सीसीटीव्ही फूटेज बंद पडणे ही गंभीर घटना; सुप्रिया सुळेंकडून संताप व्यक्त

राज्यात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. त्यातच बारामतीमध्ये धक्कादायक घडना घडली आहे. बारामती मतदारसंघात 7 मे रोजी मतदान झाले होते. मतदानानंतर बारामतीमधील सर्व मतदान केंद्रांवरील ईव्हीएम मशीन्स या एका गोदामातील स्ट्राँग रुममध्ये ठेवण्यात आल्या होत्या. ज्या स्ट्राँग रुमवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे देखरेख ठेवली जात आहे. सोमवारी सकाळी स्ट्राँगरुम बाहेर मॉनिटरवर दिसणारे सीसीटीव्ही फुटेज अचानक बंद झाल्याची घटना घडली. हे फूटेज सुमारे 45 मिनिचे बंद होते. या घटनेबाबत सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी एक्सवर याबाबत पोस्ट केली आहे.

सुप्रिया सुळे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, ईव्हीएम मशीन्स ठेवलेल्या स्ट्राँग रुमचे सीसीटीव्ही फुटेज सकाळी 10.25 वाजल्यापासून बंद आहे. यामागे नेमके काय कारण आहे? मी यासाठी त्या विभागाच्या आरओला फोन केला, पण त्यांनी फोन उचलला नाही. तिकडे टेक्निशियन्स नाहीत, आमच्या लोकांना गोदामापर्यंत जाऊ दिले जात नाही. हे सगळं काय चाललंय, असा प्रश्न लक्ष्मीकांत खाबिया विचारला. सीसीटीव्ही फुटेज बंद असताना काहीतरी काळबेरं होण्याची शक्यता तर नाही ना, असा संशय माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनात बळावल्याशिवाय राहत नाही, असेही त्यांनी म्हटले.

साधारण पाऊण तासानंतर स्ट्राँग रुमचे सीसीटीव्ही फुटेज मॉनिटरवर पुन्हा दिसायला लागले. मात्र, या काळात काही गैरप्रकार तर घडला नाही ना, अशी शंका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून व्यक्त केली जात आहे. या स्टाँग रुमचे सीसीटीव्ही कॅमेरे बंद नव्हते, असे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले. सीसीटीव्ही दिसणारी स्क्रिन काही वेळासाठी बंद होती, असे निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;