हैदराबादमध्ये भाजपच्या उमेदवाराविरोधात एफआयआर; मलकपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा

हैदराबादमध्ये भाजपच्या उमेदवाराविरोधात एफआयआर; मलकपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा

तेलंगणा येथून हैदराबाद लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या भाजपच्या उमेदवार माधवी लता यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.  भारतीय दंड विधान संहितेच्या कलम 171सी, 186, 505(1) आणि लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम 132 अन्वये मलकपेठ पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माधवी लता यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मतदान केंद्रावर मतदानासाठी बसलेल्या महिलांचे ओळखपत्र तपासत असताना दिसत आहे. या दरम्यान माधवी लता महिलांचा बुरखा हटवून तपासत होत्या. हा व्हिडीओ हैदराबादमधील एका शहरातील मतदान केंद्रावरील असल्याचा बोलले जात आहे. या व्हिडीओच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे.

सोमवारी 13 मे रोजी लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात 10 राज्यांमधील 96 जागांवर मतदान होत आहे. यामध्ये हैदराबादच्या महत्त्वाच्या जागांवरही मतदान होत आहे. येथून भाजपने माधवी लता यांना उमेदवारी दिली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;