दोन कोटींची जमीन घेतली अन् ५० कोटीला विकली…संजय राऊत यांचा मोठा गौप्यस्फोट
शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी मोठा गौप्यस्फोट केला आहे. नाशिक महानगरपालिकेत ८०० कोटी रुपयांचा भूसंपादन घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या घोटाळ्याचे लाभार्थी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. नाशिकमधील बिल्डर ठक्कर, ननवाणी आणि शाह यांच्यासह इतरांनी हा भूसंपादन घोटाळा केला आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांसोबत दोन दिवसांपूर्वी हे बिल्डर नाशिकमध्ये मांडीला मांडी लावून बसले होते, असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे. यामधील ठक्कर बिल्डर यांनी दोन कोटींची जमीन घेऊन नाशिक महानगरपालिकेला ५० कोटी रुपयांना विकल्याचा आरोप राऊत यांनी केला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List