जय बद्री विशाल

जय बद्री विशाल

10 मे रोजी केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्रीचे दरवाजे खुले होऊन उत्तराखंडची चारधाम यात्रा सुरू झाली. त्यानंतर आज बद्रीनाथचे दरवाजे भाविकांसाठी खुले झाले. पहिल्या दिवशी 20 हजारांहून अधिक भाविक बद्रीनाथाच्या दर्शनाला आले.

वैदिक मंत्रोच्चार आणि श्री बद्रीविशाल लाल की जयच्या घोषणांनी बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडण्यात आले. यावेळी 20 हजारांहून अधिक भाविक उपस्थित होते. याआधी ब्रह्ममुहूर्तावर मंदिराबाहेर गणेशपूजा केली गेली. यानंतर पुजाऱयांनी द्वारपूजन केले. मंदिराचा दरवाजा तीन चावीने उघडण्यात आला. गेल्या वर्षी 14 नोव्हेंबरला मंदिराचे दरवाजे बंद करण्यात आले होते.

सुमारे 20 क्विंटल फुलांनी मंदिराची सजावट करण्यात आली आहे. 11 मेच्या रात्रीपासून हलका पाऊस सुरू झाला. यापूर्वी हवामान खात्याने 11 ते 13 मेदरम्यान पाऊस आणि हिमवृष्टीचा इशारा दिला होता.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;