काँग्रेसमध्ये प्रेम, तृणमूलमध्ये लग्न आणि भाजपात घटस्फोट; पश्चिम बंगालमध्ये पूर्वाश्रमीचे पती-पत्नी निवडणूक रिंगणात

काँग्रेसमध्ये प्रेम, तृणमूलमध्ये लग्न आणि भाजपात घटस्फोट; पश्चिम बंगालमध्ये पूर्वाश्रमीचे पती-पत्नी निवडणूक रिंगणात

यावेळची लोकसभा निवडणूक अतिशय रोचक आणि रंगतदार बनली आहे. पश्चिम बंगालच्या विष्णुपूर येथून पूर्वाश्रमीचे पती आणि पत्नी निवडणूक रिंगणात आहेत. येथून तृणमूल काँग्रेसच्या उमेदवार सुजाता मंडल या पूर्वाश्रमीचे पती सौमित्र खान यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत.

सुजाता आणि सौमित्र यांचे नाते आणि मग घटस्पह्ट ही कहाणी अतिशय रंजक आहे. 2010 मध्ये दोघांची भेट झाली. त्यावेळी सौमित्र खान काँग्रेसमध्ये होते तर सुजाता मंडल एका सरकारी शाळेत शिक्षिका होत्या. दोघांची चांगली ओळख झाल्यानंतर काँग्रेसच्या अनेक कार्यक्रमांमध्ये दोघे दिसायला लागले. 2014 मध्ये जेव्हा सौमित्र तृणमूल काँग्रेसमध्ये गेले तेव्हा सुजाता यादेखील तृणमूलमध्ये गेल्या. त्यानंतर 2016 मध्ये कौटुंबिक विरोध झुगारून दोघांनी लग्न केले. 2019 मध्ये सौमित्र भाजपात गेले तेव्हा सुजाता यांनीही भाजपात प्रवेश केला. त्यावेळी सौमित्र यांना कोलकाता हायकोर्टाने विष्णुपूर लोकसभा मतदारसंघात प्रवेश करण्यास मनाई केली होती. त्यामुळे सुजाता यांनीच त्यांच्या प्रचाराची मोहीम सांभाळली होती. दरम्यान, 2021 मध्ये दोघांमध्ये खटके उडायला लागले. त्यानंतर सुजाता यांनी पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांच्या आधी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2022 मध्ये दोघे कायदेशीररीत्या वेगळे झाले. आता लोकसभा निवडणुकीत दोघे एकमेकांविरोधात उभे आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;