Lok Sabha Election 2024 : जालना, छत्रपती संभाजीनगरमध्ये सरासरी 60 टक्के मतदान

Lok Sabha Election 2024 : जालना, छत्रपती संभाजीनगरमध्ये सरासरी 60 टक्के मतदान

जालना, छत्रपती संभाजीनगरात मतदानाला उन्हाचा चटका बसला. या दोन्ही मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढवण्यात निवडणूक आयोगाला अपयश आले. जालना तसेच छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात सरासरी 60 टक्के मतदान झाले. मात्र बीड मतदारसंघात बाहेरून आलेल्या मतदारांनी मतदानाचा टक्का वाढवला. येथे सरासरी 68 टक्के मतदान झाले. अनेक ठिकाणी ईव्हीएम बंदच्या तक्रारी आल्या. त्यामुळे काही मतदानाची प्रक्रिया थांबली. परंतु या मशिन लगेचच बदलण्यात आल्या. किरकोळ अपवाद वगळता तीनही मतदार संघात सर्वत्र शांततेत मतदान झाले.

मतदानाच्या चौथ्या टप्प्यात मराठवाड्यातील बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात सोमवारी मतदान घेण्यात आले. रविवारी या तीनही मतदारसंघात अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढवण्याच्या निवडणूक आयोगाच्या प्रयत्नांवर पाणी पडले. सकाळी 7 वाजता मतदानाला प्रारंभ झाला. घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे उन्हानेही चटका वाढवला. बीडमध्ये सकाळपासूनच मतदारांनी उत्स्फूर्त रांगा लावल्या. शहरी भागापेक्षाही ग्रामीण भागातील मतदारांमध्ये प्रचंड उत्साह होता. मतदानाची वेळ संपली तरी अनेक मतदान केंद्रांवरील रांगा कायम होत्या. सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदारसंघात सरासरी 57.84 टक्के मतदान झाले. मात्र मतदान संपेपर्यंत हा आकडा 68 टक्क्यांवर गेला. किरकोळ अपवाद वगळता शांततेत मतदान झाले. भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी नाथर्‍यात तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी सारणीत मतदानाचा हक्क बजावला.

तांत्रिक अडचणीमुळे मतदान लांबले

बीड मतदारसंघात सकाळच्या टप्प्यात ईव्हीएम बंद पडण्याच्या घटना काही ठिकाणी घडल्या. मात्र तात्काळ या मशिन बदलण्यात आल्या. ही अदलाबदली होईपर्यंत मतदानाची प्रक्रिया थांबली होती.

बाहेरून आलेल्या मतदारांनी टक्का वाढवला

बीड जिल्ह्याचे मुळ रहिवासी असलेले पण नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने बाहेर स्थायिक असलेले, शिक्षणाच्या निमित्ताने बाहेर राहत असलेले विद्यार्थी, उसतोडीसाठी गेलेले कामगार मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी परतले. या मतदारांनी मतदानाचा टक्का काही प्रमाणात वाढला.

जालन्यात सकाळी गजबजाट, दुपारी शुकशुकाट!

जालना लोकसभा मतदारसंघात सकाळी 7 वाजल्यापासूनच मतदान केंद्रे मतदारांनी गजबजून गेली. मात्र पारा जसजसा वाढू लागला तसे दुपारनंतर मतदान केंद्रावर शुकशुकाट होता. मात्र उन्हं उतरल्यानंतर मतदारांनी पुन्हा रांगा लावल्या. सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदारसंघात 58.85 टक्के मतदान झाले. मतदाना दरम्यान कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. शहरातील दु:खीनगर आणि मधुबन कॉलनीत मतदार यादीत नाव नसल्यामुळे पाचशे मतदार मतदानापासून वंचित राहिले.

जालना शहर, भोकरदन, जाफराबाद, फुलंब्री, पैठण तसेच सिल्लोड विधानसभा मतदारसंघात सकाळी मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवला. सिल्लोड, पैठणमध्ये हा प्रतिसाद भर उन्हातही कायम होता. मात्र इतर ठिकाणी उन्हाचा जोर वाढताच मतदान केंद्रावरील गर्दी ओसरली. दुपारी चारनंतर पुन्हा मतदारांनी रांगा लावल्या. जालना शहरात नवीन मतदारांमध्ये उत्साह बघायला मिळायला. किरकोळ घटना वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;