दुधाच्या पिशव्यांपासून बनवा कंपोस्ट, प्रोसेस जाणून घ्या
नंदिनी दूध आता बायो डिग्रेडेबल पॅकेटमध्ये मिळणार आहे. प्लास्टिक पिशव्यांऐवजी पर्यावरणपूरक पॅकेजिंगमध्ये नंदिनी ब्रँडचे दूध विकण्याचा निर्णय महासंघाने घेतला आहे. बेंगळुरूमधील पायलट प्रोजेक्ट मॉडेलच्या यशामुळे देशातील दुधाच्या पिशव्यांमधून होणारे प्रदूषण कमी होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
पाकिटे अवघ्या 90 दिवसांत कंपोस्टमध्ये रूपांतरित
ही सेंद्रिय पाकिटे अवघ्या 90 दिवसांत कंपोस्टमध्ये रूपांतरित होतात. हे मॉडेल भारताच्या दूध उद्योगासाठी एक उदाहरण ठरू शकते. प्लॅस्टिकच्या तुलनेत ही सेंद्रिय पाकिटे केवळ 90 दिवसांत नैसर्गिकरित्या सेंद्रिय खतात रूपांतरित होऊ शकतात चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया.
प्रदूषण कमी होण्याचा मार्ग मोकळा
कर्नाटक दूध महासंघाने (केएमएफ) आता प्लास्टिक पिशव्यांऐवजी पर्यावरणपूरक पॅकेजिंगमध्ये नंदिनी ब्रँडच्या दुधाची पाकिटे विकण्याचा निर्णय घेतला आहे. बेंगळुरूमध्ये मिळणारे नंदिनी दूध आता बायो डिग्रेडेबल पॅकेटमध्ये मिळणार आहे. ही पाकिटे कॉर्न स्टार्च, ऊस आणि इतर वनस्पती-आधारित सामग्रीपासून बनविली जातात. बेंगळुरूमधील पायलट प्रोजेक्ट मॉडेलच्या यशामुळे देशातील दुधाच्या पिशव्यांमधून होणारे प्रदूषण कमी होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
पॉलिथिलीन पाकिटांचे विघटन होण्यास 500 वर्ष
प्लॅस्टिकच्या तुलनेत ही सेंद्रिय पाकिटे केवळ 90 दिवसांत नैसर्गिकरित्या सेंद्रिय खतात रूपांतरित होऊ शकतात, तर पारंपारिक पॉलिथिलीन पाकिटांचे विघटन होण्यास 500 वर्ष लागू शकतात. बेंगळुरू मिल्क युनियन लिमिटेडने पायलट प्रोजेक्ट म्हणून हा उपक्रम सुरू केला होता. हे मॉडेल भारताच्या दूध उद्योगासाठी एक उदाहरण ठरू शकते.
गळतीची समस्या नाही
केएमएफचे व्यवस्थापकीय संचालक शिवस्वामी बी यांनी सांगितले की, आतापर्यंत पाकिटांमध्ये गळती झाल्याची कोणतीही तक्रार आलेली नाही, दुधाचा दर्जा राखला गेला आहे आणि ग्राहक पूर्णपणे समाधानी आहेत. दररोज २० ते २५ लाख प्लॅस्टिकची पाकिटे वापरली जातात. केएमएफचे मार्केटिंग डायरेक्टर रघुनंदन एम यांनी सांगितले की, दररोज 20 ते 25 लाख प्लास्टिक पॅकेट्स वापरली जातात. विक्रीनंतर कंपनीला दरवर्षी सुमारे १५ हजार मेट्रिक टन प्लास्टिकच्या पुनर्वापरावर मोठा खर्च करावा लागतो.
या नंदिनी दूध आता बायो डिग्रेडेबल पॅकेटमध्ये मिळणार आहे. आता पाकिटे कॉर्न स्टार्च, ऊस आणि इतर वनस्पती-बेस्ड कंटेंटपासून बनविली जात आहेत. बेंगळुरूमधील पायलट प्रोजेक्ट मॉडेलच्या यशामुळे देशातील दुधाच्या पिशव्यांमधून होणारे प्रदूषण कमी होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
(डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List