उपाशी पोटी चहा प्यायल्याने अ‍ॅसिडिटी वाढते का? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात

उपाशी पोटी चहा प्यायल्याने अ‍ॅसिडिटी वाढते का? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात

भारतीय आणि चहाचं रोजचं नातं आहे. चहाशिवाय अनेकांची दिवसाची सुरुवात होत नाही. सकाळी उठल्यावर चहाचे दोन घोट घेतल्यानंतर फ्रेश वाटतं. त्यामुळे अनेक जण सकाळी उठल्याबरोबर चहाचा कप तोंडाला लावतात. पण उपाशी पोटी चहा प्यायल्याने आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतो माहिती आहे का? यामुळे पोटात आम्लता वाढते. यामुळे पचनक्रियेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला चहा पिण्याची सवय असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. जर या नियमांचं पालन केलं तर नक्कीच आरोग्याचं नुकसान होणार नाही. एम्स दिल्लीत गॅस्ट्रोलॉजी विभागाच्या माजी डॉ. अनन्य गुप्ता यांच्या मते, जेव्हा तुम्ही झोपेतून उठता तेव्हा तुमचा पोट रिकामी असतं. यामुळे पोटात गॅस्ट्रिक ज्यूस म्हणजेच अॅसिड अधिच सक्रिय असते. अशा वेळी तुम्ही जर चहा (दूध असलेला चहा) घेता तेव्हा अॅसिड वाढतं. त्यामुळे अॅसिडिटी, पोटात जळजळ, गॅस आणि ब्लोटिंगसारखी समस्या होते.

चहामध्ये कॅफीन आणि टॅनिन असते. त्यामुळे पचन प्रक्रिया खराब होऊ शकते. टॅनिनमुळे पचनप्रक्रिया मंद होते आणि भूक मरते. यामुळे उपाशी पोटी चहा घेतल्याने नैसर्गिक प्रक्रियेला नुकसान होऊ शकतं. यामुळे गॅस्ट्रिक समस्या वाढण्याची शक्यता असते. सकाळी चहा प्यायल्याने पोट भरल्यासारखं वाटतं. तसेच आंबट ढेकर आणि गळ्यात जळजळ होते. भूक लागत नाही आणि जेवायची इच्छा राहात नाही. दुपारपर्यंत पोटात गॅस आणि ब्लोटिंग राहते. जर अशी लक्षणं वारंवार दिसत असतील तर सकाळचा चहा तुमच्यासाठी चांगला नाही.

पोषण तज्ज्ञांच्या मते, “जर सकाळी रिकाम्या पोटी चहा पिण्याची सवय बराच काळ राहिली तर त्यामुळे पोटातील तीव्र आम्लता आणि जठराची सूज यासारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.”अ‍ॅसिडिटीपासून वाचण्यासाठी चहा पिण्यापूर्वी काहीतरी खा. भिजलेले बदाम, केळं किंवा सुखा टोस्ट खा. चहासाठी पर्याय शोधा. हर्बल किंवा ग्रीन टी प्या. यामध्ये कॅफीनचं प्रमाण कमी असतं. सकाळी कोमट पाणी किंवा लिंबू पाणी पोट शांत करतं. जर चहा प्यायचाच झाला तर नाश्ता करताना किंवा केल्यानंतर प्या.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

हाडात जमलेले युरिक एसिड असे बाहेर काढा, हे 4 उपाय नक्की आजमावा हाडात जमलेले युरिक एसिड असे बाहेर काढा, हे 4 उपाय नक्की आजमावा
आजकाल चुकीचा आहार आणि वाईट लाईफस्टाईलने युरिक एसिडच्या समस्या वेगाने वाढत आहे. वाढत्या वयानुसार युरिक एसिडची समस्या सर्वसामान्य मानली जाते....
कारवाई केली नाही तर कोडगेपणा तयार होईल; वादग्रस्त मंत्री, आमदारांवरून मुख्यमंत्री फडणवीसांनी अजित पवार, मिंध्यांचे कान टोचले!
माघी गणपतीच्या विसर्जनाला परवानगी द्या, सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची मागणी
Thailand-Cambodia Conflict – थायलंडकडून 8 सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये मार्शल लॉ लागू, कंबोडियाविरुद्धचे युद्ध भडकले
Nagar News – महाराष्ट्राची वाटलाच अधोगतीकडे, बाळासाहेब थोरात यांची राज्य सरकारवर टीका
Nagar News – किरण काळे यांना न्यायालयीन कोठडी
महायुती सरकारने शिवभोजन थाळी विकणाऱ्यांवरच आणली उपासमारीची वेळ, 3 महिन्याचे अनुदान थकवले