औषधांशिवाय करा सर्दी-खोकल्यावर मात, वापरा हे सोपे उपाय

औषधांशिवाय करा सर्दी-खोकल्यावर मात, वापरा हे सोपे उपाय

पावसाच्या सिझनमध्ये हवामानातली थंडी, आर्द्रता आणि बदलती हवा आपल्या शरीरावर थेट परिणाम करत असते. विशेषतः मुलं आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यात या काळात सर्दी, खोकला आणि अंग दुखी यासारख्या समस्या सामान्य होतात. पावसात भिजलेली रस्ते, गार वारे आणि दमट वातावरण आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी करतं आणि परिणामी गळ्याला खवखव, नाक वाहणं, शिंका येणं आणि खोकल्याचा त्रास सुरू होतो.

या समस्येवर डॉक्टर सांगतात की, सुरुवातीच्या टप्प्यातच घरगुती उपाय वापरल्यास वेळीच आराम मिळतो आणि शरीरावर कुठलाही साइड इफेक्ट होत नाही. आयुर्वेद आणि पारंपरिक नुस्ख्यांमध्ये अशी ताकद आहे की ते पावसाळ्यात होणाऱ्या सर्दी-खोकल्याच्या त्रासाला मुळापासून नष्ट करू शकतात.

उपाय

1. अदरक आणि मध : पावसाळ्यात थंडी आणि दमट हवामानामुळे सर्दी, खोकला आणि गळ्याचे त्रास वाढतात. अशावेळी अदरक आणि मध ही सोपी पण प्रभावी जोडी खूप उपयोगी ठरते. अदरकात अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, तर मध गळ्याला आराम देतो. एक चमचा ताजं अदरकाचं रस काढून त्यात एक चमचा शुद्ध मध मिसळा आणि हे मिश्रण दिवसातून दोन वेळा घ्या. यासोबत दिवसभर गुनगुना पाणी प्यावं आणि थंड पाण्याचे सेवन टाळावं. यामुळे खोकल्यावर आराम मिळतो आणि झोपही चांगली लागते.

2. वाफ घ्या : सर्दीमुळे नाक बंद होणं आणि छातीत जडपणा येणं पावसात नेहमीच होतं. यावर वाफ घेणं हा एक उत्तम आणि सहज उपाय आहे. गरम पाण्यात पुदिन्याची 5-6 पानं किंवा थोडंसं विक्स टाका. नंतर डोकं आणि तोंड टॉवेलने झाकून 7 मिनिटं वाफ घ्या. दिवसातून दोन वेळा हा उपाय केल्यास फुफ्फुसं साफ होतात, श्वसन मार्ग मोकळा होतो आणि सर्दी-खोकल्यात झपाट्याने आराम मिळतो.

3. तुळस-काळी मिरीचं काढा : तुळस आणि काळी मिरीचा काढा हा आजीबाईंचा अमोघ उपाय मानला जातो. तुळस नैसर्गिक इम्युनिटी बूस्टर आहे आणि काळी मिरी इन्फेक्शनशी लढण्यास मदत करते. एका कप पाण्यात 5 तुळसीची पानं, 3 काळी मिरी आणि थोडं अदरक टाकून 5 मिनिटं उकळा. नंतर गाळून कोमट प्या. चव वाढवण्यासाठी थोडे मध घालू शकता. हा काढा शरीरातील विषारी घटक बाहेर टाकतो आणि शरीरात उष्णता निर्माण करून सर्दी-खोकल्यावर प्रभावीपणे काम करतो.

एकंदरीत, पावसाळ्यात सर्दी-खोकल्याची भीती बाळगण्याची गरज नाही. थोडीशी काळजी आणि घरगुती देसी उपाय तुमचं आरोग्य टिकवण्यासाठी पुरेसे आहेत. हे उपाय केवळ सुरक्षित नाहीत, तर दररोजच्या सवयींमध्ये सामावून घेतल्यास संपूर्ण पावसाळा निरोगी, आरामदायक आणि औषधांशिवाय सुदृढपणे घालवता येतो. आजपासूनच हे उपाय अमलात आणा आणि घरबसल्या सर्दी-खोकल्यावर मात करा, कुठलाही साइड इफेक्ट न करता.

(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

अमेरिकेतून 1,553 हिंदुस्थानींची वापसी अमेरिकेतून 1,553 हिंदुस्थानींची वापसी
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर यंदाच्या 20 जानेवारीपासून अमेरिकेने 1,553 हिंदुस्थानी नागरिकांना हद्दपार केले आहे. अशी माहिती...
अत्याचारानंतर तरुणीने जीवन संपवले, ओदिशात विरोधकांचा बंद
रे रोड स्थानकाजवळ पादचारी पूल उभारा, मनोज जामसुतकर यांची मागणी
‘आकाश प्राइम डिफेन्स’ यंत्रणेची यशस्वी चाचणी
घनकचरा विभागाच्या खासगीकरणाचा निर्णय आठवडाभरात रद्द करा, अन्यथा ‘काम बंद’! संपाचा निर्णय 23 जुलैपर्यंत स्थगित
अध्यक्षांनी विधिमंडळाची परंपरा धुळीस मिळवली, भास्कर जाधव यांचा संताप
दुचाकीच्या धडकेने झालेल्या अपघातात 7 ठार