साहित्यिक रमेश कोटस्थाने यांचे निधन
प्रसिद्ध लेखक, नाटककार प्रा. रमेश कोटस्थाने यांचे मंगळवारी अल्पशा आजाराने निधन झाले. वयाच्या 76व्या वर्षी त्यांनी पुणे येथील निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला.
प्रा. रमेश कोटस्थाने यांनी कथा, रहस्य कथा, कविता, कादंबरी, नाटक, एकांकिका, चित्रपट कथा लेखन व संवाद लेखन, ललित लेख, बाल साहित्य, श्रुतिका व समीक्षा या सर्व माध्यमातून समर्थपणे लेखन केले. त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली. 1980च्या दशकात प्रा. कोटस्थाने यांचे ‘घरात हसरे तारे’ हे विनोदी नाटक किशोर प्रधान व शोभा प्रधान यांनी मराठी रंगभूमीवर गाजवले होते. त्याच दशकात त्यांच्या अनेक एकांकिका कॉलेज स्पर्धांमध्ये गाजल्या. या एकांकिकांनी प्रतिष्ठsचे पुरस्कार पटकावले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List