वारकऱ्यांना अर्बन नक्षल म्हणणाऱ्या सरकारचा धिक्कार असो! विधिमंडळाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीच्या आमदारांची घोषणाबाजी

वारकऱ्यांना अर्बन नक्षल म्हणणाऱ्या सरकारचा धिक्कार असो! विधिमंडळाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीच्या आमदारांची घोषणाबाजी

सरकारमधील मंत्री भ्रष्टाचारात व्यस्त असताना दिशाभूल करण्यासाठी महायुतीचे नेते मात्र पंढरपूरच्या आषाढी वारीत नक्षलवादी घुसल्याचे सांगून महाराष्ट्राचा समृद्ध वारसा असलेल्या आषाढी वारीला बदनाम करत आहे. सरकारच्या या षडयंत्राचा महाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले.

राज्य सरकारच्या मंत्रिमंडळातील मंत्री आपल्या अधिकारांचा गैरवापर करून राज्यातील जमिनी बळकावत आहेत. सत्ताधारी वारी सारख्या हिंदू धर्मातील पवित्र मार्गाला अर्बन नक्षल म्हणून विठुरायाला आणि वारकऱ्यांना बदनाम करत आहेत. सत्ताधाऱ्यांच्या या अपमानकारक जुलमशाही विरोधात महाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. यावेळी आमदारांनी हातात संविधानाचे पुस्तक धरून सरकारवर निशाणा साधला.

घोटाळे बाज सरकारचा धिक्कार असो…शेतकरी उपाशी मंत्री तुपाशी…वारकऱ्यांना अर्बन नक्षल म्हणणाऱ्या सरकारचा धिक्कार असो…भूखंड लाटणाऱ्या सरकारचा धिक्कार असो…वारीला बदनाम करणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा धिक्कार असो…मंत्रोच्चार करून सोयाबीनचे पीक वाढवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो…भूखंडाचा श्रीखंड खाणाऱ्या भ्रष्ट मत्र्यांचा धिक्कार असो, अशा जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

तुम्हीपण तुमच्या मुलांना केचपसोबत चपाती-पराठा देता का? नुकसान माहितीये का? तुम्हीपण तुमच्या मुलांना केचपसोबत चपाती-पराठा देता का? नुकसान माहितीये का?
आजच्या काळात मुलांच्या खाण्याच्या सवयी खूप बदलल्या आहेत. धावपळीचे जीवन, काम करणाऱ्या पालकांचे व्यस्त वेळापत्रक आणि बाजारात उपलब्ध असलेल्या रेडी-टू-ईट...
ND Vs ENG 2nd Test – शुभमन गिलच्या विक्रमापुढे गावसकर, तेंडुलकर, कोहली सर्वच फेल! अशी कामगिरी करणारा आशिया खंडातला पहिलाच कर्णधार
Bihar Election 2025 – राज्यातील 20 टक्के मतदारांवर कात्री चालवण्याचा प्रयत्न, निवडणूक आयोगाची भूमिका संशयास्पद; काँग्रेसचा गंभीर आरोप
Latur News – हडोळतीच्या शेतकरी दाम्पत्याला हैदराबादच्या संस्थेचा मदतीचा हात तर, अनेकांची नुसतीच आश्वासनं आणि भेटीचे फोटोसेशन
Nanded News – प्रधानमंत्री पीकविमा योजनेत मोठा घोटाळा, 40 सेतू सुविधा केंद्रांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल
सत्ता येते-जाते, तुम्ही भाजपचे गुलाम का बनताय? काँग्रेसचा निवडणूक आयोगाला इशारा
परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचे पुत्र आणि अजित डोवाल यांच्या संस्थेला चीनचे फंडिंग