सार्वजनिक आरोग्य विभागाने कॅन्सर निदान करण्यासाठी घेतलेल्या व्हॅनच्या खरेदीत घोटाळा, विजय वडेट्टीवार यांचा आरोप

सार्वजनिक आरोग्य विभागाने कॅन्सर निदान करण्यासाठी घेतलेल्या व्हॅनच्या खरेदीत घोटाळा, विजय वडेट्टीवार यांचा आरोप

सार्वजनिक आरोग्य विभागाने कॅन्सरचे निदान करण्यासाठी आठ कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅनची खरेदी करण्यात आली आहे. पण या व्हॅन दुप्पट तिप्पट दराने खरेदी करण्यात आल्या आहेत. या प्रकरणात गैरव्यवहार झाला आहे , याची चौकशी होऊन अधिवेशन संपण्याच्या आत त्याचा अहवाल सभागृह समोर मांडावा अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

सरकारने आठ कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅनची खरेदी केली. एका व्हॅनची किंमत 40 लाखांच्या वर होऊ शकत नाही. या व्हॅन मधील यंत्र ही 12 लाखांच्या किंमतीपेक्षा अधिक नाही. अेसे असताना वाहने खरेदी करताना अधिकच्या किंमतीने घेण्यात आली आहेत. कॅन्सर सारखा जीवघेणा आजार आहे, त्याच्या संबंधित व्हॅन आहेत, त्यातील काही यंत्र बंद पण पडली आहे. या खरेदीत भ्रष्टाचार झाला आहे याबाबत चौकशी सुरू आहे अजून अहवाल देखील आला नाही मग नेमकी काय सुरू आहे? असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.

वारकऱ्यांना अर्बन नक्षल म्हणणाऱ्या सरकारचा धिक्कार असो! विधिमंडळाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीच्या आमदारांची घोषणाबाजी

अधिवेशन संपण्याच्या आत हा अहवाल सभागृह समोर मांडला पाहिजे अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. यावर अध्यक्षांनी या प्रकरणी चौकशी अधिवेशन संपण्याच्या आत पूर्ण करून अहवाल सदना समोर मांडण्याचे निर्देश दिले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;