Hair Care – केसांच्या उत्तम आरोग्यासाठी मेथीदाणे वरदानापेक्षा कमी नाही, वाचा

Hair Care – केसांच्या उत्तम आरोग्यासाठी मेथीदाणे वरदानापेक्षा कमी नाही, वाचा

केसात होणारा कोंडा ही समस्या आता साधी राहिली नाही. केसात कोंडा झाल्यामुळे, आपले केस गळण्यास सुरुवात होते. कोंड्यामुळे केसांचा पोतही बिघडतो. आपल्यापैकी प्रत्येकीला काळेभोर केस हवे असतात. परंतु काळ्याभोर लांबसडक केसांसाठी आपल्या डोक्याला नियमितपणे मालिश करणे खूप गरजेचे आहे. नैसर्गिक आणि आयुर्वेदिक औषधी वनस्पतींपासून तयार केलेले तेल केसांना लावण्याचेही अनेक फायदे आहेत. केसांच्या उत्तम आरोग्यासाठी मेथीदाणे हे खूप फायद्याचे आहेत. केसांमधील कोंड्याची समस्या कमी करण्यासाठी मेथी प्रभावी आहे. यासोबतच मेथी केसांची चमक वाढवण्यासही मदत करते.

मेथीचे दाणे आणि नारळाचे तेल हे मिश्रण केसांमध्ये जादुई फरक आणते आणि केसांना आणि टाळूला पोषण देते. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मेथी आणि खोबरेल तेल केसांना लावल्याने केसांची वाढ वाढते. यामुळे केस लांबसडक आणि सुंदर होतात, तसेच केसांना खोबरेल तेल-मेथी लावण्याचे काय फायदे आहेत ते जाणून घेऊया.

Hair Care – केसांना मेहंदी लावण्याचे खूप सारे फायदे, वाचा

नारळाच्या तेलात लॉरिक अ‍ॅसिड असते हे केसांच्या मुळांसाठी खूप गरजेचे आहे. त्याचप्रमाणे मेथीमध्ये आढळणारे प्रथिने आणि निकोटिनिक अॅसिड सारखे घटक केसांची वाढ वाढवतात. यामुळे केसांची लांबी वाढते.

केस अकाली पांढरे होण्याच्या समस्येपासून रोखण्यासाठी, नारळाचे तेल आणि मेथीच्या दाण्यांपासून बनवलेले हे हर्बल तेल तुमच्या केसांना लावू शकता. केसांची ताकद वाढवण्यासोबतच, ते केसांना अकाली पांढरे होण्यापासून देखील रोखते.

2 चमचे मेथीचे दाणे आणि मूठभर कढीपत्ता 100 मिली नारळाच्या तेलात 10-15 मिनिटे उकळवा. नंतर हे तेल थंड होऊ द्या. थंड झाल्यावर तेल गाळून बाटलीत भरा. शॅम्पू करण्यापूर्वी तुम्ही हे तेल तुमच्या टाळूला मसाज करण्यासाठी वापरू शकता.

केसांचा कोरडेपणा कमी करण्यासाठी, नारळाचे तेल आणि मेथीच्या दाण्यांपासून बनवलेले हे तेल लावू शकता. हे तुमच्या टाळूला देखील पोषण देते. पोषण मिळाल्याने केस मऊ आणि रेशमी होतात आणि केसांची ताकदही वाढते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर चिंता करु नका, रामदेव बाबांनी सांगितला सोपा उपाय बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर चिंता करु नका, रामदेव बाबांनी सांगितला सोपा उपाय
रामदेव बाबा हे भारतातील सर्वात मोठे योगगुरु आहेत. ते योग शिकवतात, तसेच आयुर्वेदिक औषधी वनस्पतींद्वारे आरोग्याच्या समस्या सोडवण्यातही मदत करतात....
Nanded News – वंचित बहुजन आघाडीच्या युवा आघाडीतर्फे आमदार हेमंत पाटील यांच्या प्रतिमेला जोडे मारले; अर्बन नक्षलवादाच्या वक्तव्याचा निषेध
विठ्ठल चरणी भाविकांचे भरभरुन दान; देवाच्या खजिन्यात 11 कोटी जमा, गेल्यावर्षीपेक्षा 2 कोटींची वाढ
इस्रायलचा सीरियावर ड्रोन हल्ला, दमिश्कमधील संरक्षण मंत्रालय केलं उद्ध्वस्त
ट्रम्पनंतर आता नाटोचीही रशियाला धमकी; रशियाच्या व्यापारी भागीदारांना 100 टक्के टॅरिफ लावणार
श्री विठ्ठल रूक्मिणी मातेची प्रक्षाळपुजा संपन्न, 24 तास दर्शन व्यवस्था आजपासून बंद
आसामचे मुख्यमंत्री हे देशातील सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री, राहुल गांधींचा हिमंता बिस्वा सरमांवर हल्लाबोल