चीन-पाकिस्तान हिंदुस्थानच्या टप्प्यात; डीआरडीओकडून हायपरसोनिक मिसाईलची चाचणी

चीन-पाकिस्तान हिंदुस्थानच्या टप्प्यात; डीआरडीओकडून हायपरसोनिक मिसाईलची चाचणी

संरक्षण संशोधन आणि विकास संघटना म्हणजेच डीआरडीओने एक मोठी किमया करून दाखवली आहे. डीआरडीओने एक्सटेंडेड ट्रझॅक्टरी लाँग डयूरेशन हायपरसोनिक क्रूझ मिसाईल (ईटी-एलडीएचसीएम) ची यशस्वी चाचणी केली आहे. हे प्रोजेक्ट विष्णू अंतर्गत विकसित करण्यात आली आहे. ही मिसाईल आपला वेग, रेंज आणि लक्ष्य यासाठी ओळखली जाणार आहे. ही एक हायपरसोनिक क्रूझ मिसाईल आहे. याला डीआरडीओने पूर्णपणे स्वदेशी टेक्नोलॉजी ने बनवले आहे. याचे खास वैशिष्टये म्हणजे ही हायपर सोनिक मिसाईल सध्याच्या सुपरसोनिक मिसाइल ब्रह्मोस पेक्षा पैक पटीने वेगवान आहे. पाकिस्तान आणि चीन हे दोन देश हिंदुस्थानच्या टप्प्यात येत आहेत. या मिसाईलला गुजरातपासून लाँच केले तर इस्लामाबाद, कराची, लाहोर, रावळपिंडी टप्प्यात येतात. अरुणाचल किंवा लडाखहून ही मिसाईल लाँच केली तर चीनमधील तिब्बत, शिंजियांग ही ठिकाणे टप्प्यात येतात.

क्षेपणास्त्राचे खास वैशिष्टय़े

ही मिसाईल मॅक 8 च्या वेगाने उड्डाण करू शकते. जी जवळपास 11 हजार प्रति किलोमीटर आहे. ब्रम्होस सुपरसोनिक च्या तुलनेत तीन पट जास्त वेगवान आहे.

या मिसाईलची रेंज क्षमता 1500 किमी आहे. याचाच अर्थ चीन आणि पाकिस्तान हे दोन्ही देश या मिसाईल च्या टप्प्यात येतात. शत्रूंच्या कोणत्याही टप्प्यात हल्ला करण्याची क्षमता आहे.

या मिसाईलमध्ये 1 हजार ते 2 हजार किलो वजनाची परमाणू वारहेड घेऊन जाण्याची क्षमता आहे. यात व्रॅमजेट इंजिन दिले आहे. जे वायुमंडल ते ऑक्सिजन घेऊन इंधन जाळते.

ही मिसाईल कमी उंचीवरून उडू शकते. ही मिसाईल रडार पासून स्वतःला वाचवते. ही दिशा बदलते. याला शत्रूचे एअर डिफेन्स सिस्टम सुद्धा थांबू शकत नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर चिंता करु नका, रामदेव बाबांनी सांगितला सोपा उपाय बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर चिंता करु नका, रामदेव बाबांनी सांगितला सोपा उपाय
रामदेव बाबा हे भारतातील सर्वात मोठे योगगुरु आहेत. ते योग शिकवतात, तसेच आयुर्वेदिक औषधी वनस्पतींद्वारे आरोग्याच्या समस्या सोडवण्यातही मदत करतात....
Nanded News – वंचित बहुजन आघाडीच्या युवा आघाडीतर्फे आमदार हेमंत पाटील यांच्या प्रतिमेला जोडे मारले; अर्बन नक्षलवादाच्या वक्तव्याचा निषेध
विठ्ठल चरणी भाविकांचे भरभरुन दान; देवाच्या खजिन्यात 11 कोटी जमा, गेल्यावर्षीपेक्षा 2 कोटींची वाढ
इस्रायलचा सीरियावर ड्रोन हल्ला, दमिश्कमधील संरक्षण मंत्रालय केलं उद्ध्वस्त
ट्रम्पनंतर आता नाटोचीही रशियाला धमकी; रशियाच्या व्यापारी भागीदारांना 100 टक्के टॅरिफ लावणार
श्री विठ्ठल रूक्मिणी मातेची प्रक्षाळपुजा संपन्न, 24 तास दर्शन व्यवस्था आजपासून बंद
आसामचे मुख्यमंत्री हे देशातील सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री, राहुल गांधींचा हिमंता बिस्वा सरमांवर हल्लाबोल