Weight Loss Diet – वजन कमी करण्यासाठी ‘या’ पीठाची भाकरी खायलाच हवी
वजन कमी कमी करण्यासाठी खूप प्रकारची विविध डाएट करण्यापेक्षा योग्य आहार घेणे हे गरजेचे आहे. वजन कमी करण्यासाठी काहीच न खाण्यापेक्षा जे खातोय ते योग्य खातोय का हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे आपला आहार आणि इतर सर्व सवयीही बदलत चालल्या आहेत. यामुळे आपल्या वजनावर फार मोठा परीणाम होऊ लागलेला आहे. सध्या कुमारवयीन मुलांपासुन ते सर्वांचेच वजन वाढु लागलेलं आहे. वजनवाढीची ही समस्या सध्या मोठ्या प्रमाणात भेडसावु लागली आहे.
ज्वारीची भाकरी की मक्याची भाकरी?
आपण वजन कमी करण्याच्या बाबतीत दोन्ही भाकऱ्यांमध्ये फरक जाणून घेऊया. पोषणाच्या बाबतीत दोघांमध्ये कोणताही महत्त्वाचा फरक नाही. 100 ग्रॅम ज्वारीच्या पिठाबद्दल बोलायचे झाले तर, त्यात 9.7 ग्रॅम फायबर, 72 ग्रॅम कार्ब्स आणि 360 कॅलरीज असतात.
मक्याच्या पीठाबद्दल बोलायचे झाले तर, त्यात 7 ग्रॅम फायबर, 6.8 ग्रॅम प्रथिने, 77 ग्रॅम कार्ब्स असतात आणि कॅलरीजचे प्रमाण प्रति 100 ग्रॅम सुमारे 360 असते.
चपाती की भाकरी असा प्रश्न वजन कमी करणाऱ्या प्रत्येकाला पडतो. चपातीपेक्षा भाकरी ही पचनासाठी सुलभ असते. त्यामुळेच वजन कमी करण्यासाठी भाकरी खाण्याचा सल्ला हा दिला जातो. चपाती करताना तेलाचा वापर हा बऱ्यापैकी होतो, तेच भाकरी करताना मात्र तेल लागत नसल्यामुळे वजन कमी करण्यासाठी भाकरी ही सर्वात उपयुक्त मानली जाते.
मुख्य म्हणजे ज्वारी, बाजरी, नाचणी या पीठांमध्ये फायबरचे प्रमाण हे खूप असते. त्यामुळेच वजन कमी करण्यासाठी या पीठांची भाकरी ही उत्तम मानली जाते.
Health Tips – रिकाम्या पोटी ‘ही’ पाने खाणे वजन कमी करण्यास आहे फायदेशीर
दोन धान्यांचे पीठ एकत्र करुन भाकरी करणे हे कायम हितावह असते. त्यामुळे आपल्याला दोन्ही पीठांच्या पोषक तत्वाचा लाभ मिळतो.
वजन कमी करण्याचा विचार केला तर गव्हाच्या पिठाची चपाती कमी खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण गव्हाच्या पिठात फायबर आणि इतर पोषक तत्वांचे प्रमाण चांगले असते, परंतु त्यात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते. तसेच काही लोकांना गव्हाची अॅलर्जी असते.
वजन कमी करण्यासाठी ज्वारी आणि मक्याची भाकरी मोठ्या प्रमाणात खातात, कारण सामान्यतः गव्हाच्या पिठाच्या चपात्यांपेक्षा या भाकऱ्या जास्त फायदेशीर मानल्या जातात. तसेच त्यात कार्बोहायड्रेट्स आणि कॅलरीज कमी असतात.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List