Health Tips – रात्री झोप न येण्यामुळे त्रस्त असाल तर, हे उपाय नक्की करुन बघा
शरीर निरोगी राहण्यासाठी झोप ही खूपच आवश्यक आहे. नीट झोप न झाल्यास, आपल्या शरीरावर फार वाईट परीणाम होतात. म्हणूनच योग्य वेळ झोप ही खूपच गरजेची आहे. शरीराचे कार्य उत्तम चालण्यासाठी, किमान 7 ते 8 तास झोप ही गरजेची आहे. झोप न येणं म्हणजे विविध आजारांना आमंत्रण देण्यासारखं आहे. तुमची झोप नीट झाली नाही तर, त्याचा परीणाम मोठ्या प्रमाणात आरोग्यावर होतो. म्हणूनच निरोगी राहण्यासाठी शरीर आणि मन दोन्ही तंदुरुस्त राहणं हे गरजेचे आहे. म्हणूनच शरीरासोबत मनालाही विश्रांती देणं हे आवश्यक आहे. तरच तुम्ही पूर्णपणे निरोगी राहू शकाल.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमच्या झोपेच्या वेळा निश्चित करा, दररोज एकाच वेळी झोपण्याची सवय लावा. झोपण्यापूर्वी किमान दोन तास आधी जेवावे. यामुळे पचनक्रिया चांगली राहते आणि गाढ झोप येण्यास मदत होते. रात्रीचे जेवण 7-8 वाजता केले तर वजनही नियंत्रणात राहते.
रात्री झोपण्यापूर्वी अर्धा तास आधी कोमट दूध प्यावे. चिमूटभर हळद घातल्याने चांगली झोप येते. खूप गरम दुध न घेता, दुध कोमट करुन दुधात वेलची, खसखस किंवा बडीशेप घालू शकता. यामुळे झोपही चांगली होते. केशरयुक्त दूध तणाव कमी करते आणि चांगली झोप येण्यास मदत करते.
रात्री उशिरा झोपण्याची सवय असेल तर तुम्ही ती सवय बदलायला हवी. वेळेवर झोपलात आणि रात्री वारंवार जागे होत राहिलात तर याचा तुमच्या शारीरिक आरोग्यावर तसेच मानसिक आरोग्यावरही वाईट परिणाम होतो. चांगल्या झोपेसाठी काय करावे ते जाणून घेऊया.
झोपेची पद्धत सुधारायची असेल, तर तुम्ही झोपण्यापूर्वी बेडवर काही सोपी योगासन करू शकता. यामुळे आपले मन शांत होते आणि झोपेची गुणवत्ता सुधारते.
बऱ्याच वेळा थकलेले असूनही आपल्याला झोप येत नाही. अशा परिस्थितीत पायांच्या तळव्यांना मसाज केल्यास, तुम्हाला खूप आराम वाटेल. पायाखाली उशी घेऊन झोपा आणि उशीशिवाय डोके सरळ ठेवा. तुम्ही आरामात त्यामुळे झोपू शकाल.
रात्री जेवणानंतर, काही मिनिटे वज्रासनात बसावे किंवा 15 ते 20 मिनिटे शतपावली करावी.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List