शिवडीतील विद्यार्थ्यांसाठी बस सेवा पूर्ववत सुरू करा, अन्यथा जोरदार आंदोलन करणार; शिवसेनेचा पालिकेला इशारा
प्रबोधनकार ठाकरे स्कूल, शिवडी कोळीवाडा तसेच अभ्युदय नगर या महापालिकेच्या शाळेत शिवडी पूर्वेकडून बरेचसे विद्यार्थी येतात. मात्र, बेस्ट प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेले गेल्या दोन वर्षांचे बिल पालिकेच्या शिक्षण विभागाने थकवल्यामुळे शाळा सुरू होऊन महिना झाला तरी या मार्गावर बस सेवा सुरू झालेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. या पार्श्वभूमीवर बस सेवा पूर्ववत सुरू न केल्यास विद्यार्थी आणि पालकांना घेऊन जोरदार आंदोलन केले जाईल, असा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे.
ही बससेवा सुरू करण्यासाठी 15 दिवसांपूर्वी माजी नगरसेवक सचिन पडवळ यांच्या वतीने शिक्षणाधिकारी राजेश पंकाळ यांच्याकडे पत्रव्यवहार करण्यात आला. तरीही याबद्दल ठोस कारवाई झालेली नाही. याची दखल घेऊन आज शिवसेना शाखा क्र. 206 च्या वतीने मनपा शिक्षण विभागाचे उपशिक्षण अधिकारी निसार खान यांची भेट घेऊन प्रश्न निदर्शनास आणून देण्यात आला. यावेळी शाखाप्रमुख हनुमंत हिंदोळे तसेच शिवडी पूर्व परिसरातील शिवसैनिक उपस्थित होते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List