Monsoon Snacks – पावसाचा आनंद लुटण्यासाठी बनवा मस्त क्रिस्पी मक्याचे कटलेट
पावसाळा सुरु होताच, जिभेलाही चटपटीत खाण्याचे वेध लागतात. पावसाळ्यात खासकरुन भजी खाण्याचे प्रमाण वाढते. अशाच मस्त कोसळणाऱ्या पावसात बाजारात विकायला येणारा मका सुद्धा आपल्या आरोग्यासाठी पौष्टिक आहे. मक्याचे कटलेट बनवणे हे फार वेळखाऊपणाचे काम नाही. त्यामुळे अगदी घरच्या साहित्यामध्ये सुद्धा मक्याचे कटलेट करता येतात.
मक्याचे कटलेट
साहित्य :
5 मध्यम आकाराचे बटाटे
1 वाटी मक्याचे दाणे-अमेरिकन पिवळे मके असतील तर उत्तम
3 ते 4 हिरव्या मिरच्या
साधारण 2 पेराएवढा आल्याचा तुकडा
4 ते 5 लसूण पाकळ्या
4 ते 5 ब्रेड स्लाईस
4 ते 5 चमचे रवा
मीठ
तेल
तिखट चवीनुसार
कृती :
सर्वात आधी मक्याचे कणिस आणि बटाटे उकडवून घ्या. त्यानंतर उकडलेला मका व्यवस्थित सोलून घ्या. बटाटे थंड झाल्यानंतर, व्यवस्थित कुस्करुन घ्या.
ब्रेडचे स्लाइस पाण्यातून काढा व पिळून घ्या. स्लाइसचा चांगला लगदा करुन त्यात बटाटे आणि उकडलेल्या मक्याचे दाणे चांगले पिठासारखे मळून घ्या.
कमी खर्चात चटपटीत पाणीपुरी करा घरच्या घरी, आता बाहेर जाण्याची गरज नाही!
त्यानंतर त्यामध्ये आले, लसूण, मिरची वाटून त्याची पेस्ट घालावी. चवीनुसार मीठ घालून पुन्हा चांगले मळून घ्यावे. मिश्रण मळताना सगळीकडे तिखटमीठ लागेल असे पाहा.
एका ताटलीत रवा घ्या. गोल, लांबट हव्या त्या आकाराचे कटलेट वळा व हे कटलेट रव्यात घोळवा आणि पॅनमध्ये मध्यम आचेवर शॅलोफ्राय करा.
गरम गरम कटलेट टोमॅटो सॉस किवा चिंचगूळ, खजुराच्या चटणीसोबत सर्व्ह करा.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List