कतरिना कैफने 42 व्या वर्षात उभे केले 200 कोटींचे साम्राज्य

कतरिना कैफने 42 व्या वर्षात उभे केले 200 कोटींचे साम्राज्य

बॉलीवूडची सुपर स्टार अभिनेत्री कतरिना कैफ सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. बॉलीवू़डचा भाईजान अभिनेता सलमान खानने जरी तिला इंडस्ट्रीत आणलं असलं तरी तिने स्वत:च्या कर्तृत्वाने आपलं साम्राज्य उभं केलं. कतरिनाने अभिनयासोबत उद्योग क्षेत्रातही आपलं नाव कामवलं. अभिनयाचा कसलाही अनुभव नसताना इंडस्ट्रीत येऊन तब्बल 263 कोटींची मालकीण बनली आहे. यामुळे तिच्या नवऱ्याला विक्की कौशल आणि तिच्या संपूर्ण कुटुंबाला तिचा सार्थ अभिमान आहे. नुकतेच तिने 42 व्या वर्षात पदार्पण केले आहे.

कतरिना कैफ 42 ची झाली असली तरी, तिच्या फिटनेसकडे पाहून मात्र तिचे वय अजिबात लक्षात येत नाही. कतरिना ही कायमच फिटनेसच्या बाबतीत जागरुक असलेली दिसून येते. फिटनेस आणि डाएट याचं उत्तम काॅम्बिनेशन साधत कतरिना ही कायमच तिच्या लव्हली स्माईलमुळे आणि क्यूट दिसण्यामुळे चर्चेत राहिली आहे.

कतरिनाचा करोडपती बनण्याचा प्रवास काही सोपा नव्हता. सिनेसृष्टीत येऊन आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने अनेक सिनेमे केले. मात्र सुरूवातीला तिला तेवढं प्रोत्साहन मिळालं नाही. त्यामुळे तिने पुन्हा माघार घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र तेव्हाच 2007 रोजी बहुचर्चित चित्रपट नमस्ते लंडनने तिला प्रसिद्धीच्या झोतात आणलं. तेव्हापासून कतरिना फेमस झाली.

भारत, झिरो, राजनिती आणि एक था टायगर यांसारख्या चित्रपटातून कतरिना प्रचंड फेमस झाली. कतरिनाने इंडस्ट्रित नाव कमावल्यानंतर तिने उद्योग क्षेत्रात पदार्पण केलं. एकेकाळी ‘Preety Girl’ ची ओळख असलेली कतरिना आता ‘Powerful business Women’ म्हणून ओळखली जातेय. 2019 मध्ये कतरिना ने तिचा स्वत: ब्युटी ब्रॅंड सुरू केला. ‘Kay Beauty’ असं त्याचं नाव आहे. आजच्या महागाईच्या काळातही कतरिनाच्या या ब्रॅंडच्या प्रोडक्ट्सची बाजारात भरपूर मागणी आहे.

240 कोटींच्या बिझनेसची मालकीण बनली कतरिना

के ब्युटीच्या या ब्युटी ब्रॅंड लाँच करण्याआधी कतरिनाने 2018 रोजी नायका या ब्रॅंडसोबत पार्टनरशिप केली. यासाठी या कंपनीत तिने 2.04 कोटी रुपये गुंतवले. यानंतर तब्बल तीन वर्षात या कंपनीचा टर्न ओव्हर 22 कोटींपर्यंत पोहोचला. या कमाल यशामुळे कतरिनाला उद्योग क्षेत्रात आत्मविश्वास वाढला आणि तिला एक वेगळा अनुभवही घेता आला. याचाच फायदा तिने स्वत:चा बिझनेस सुरू करण्यासाठी केला. 2025 मध्ये आलेल्या अहवालानुसार, फक्त सहा वर्षांत, कॅटरिनाच्या ब्रँडने देशातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या कॉस्मेटिक ब्रँडमध्ये स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. आता 2025 मध्ये तिच्या ब्रॅंडने 240 कोटींची कमाई केली आहे.

कतरिनाची  एकूण मालमत्ता
तिच्या यशस्वी व्यवसायाव्यतिरिक्त, कतरिनाकडे हिंदुस्थान आणि परदेशात अनेक मालमत्ता आहेत. तिच्याकडे मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील पॉश मौर्य हाऊसमध्ये एक दुमजली अपार्टमेंट आहे. 17 कोटी रुपयांची किंमत असलेल्या या अपार्टमेंट ती अभिनेता विकी कौशलशी लग्न करण्यापूर्वी राहत होती. याशिवाय तिच्याकडे लंडनमध्ये अंदाजे 7.2 कोटी रुपयांचे घर देखील आहे. ती सध्या विकी कौशलसोबत त्यांच्या जुहू येथील आलिशान अपार्टमेंटमध्ये राहते.

कतरिनाची एकूण संपत्ती
फिनकॅशच्या मते, कतरिना कैफची एकूण संपत्ती 263 कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासदार संजय राऊत यांनी अहिल्यानगर महानगरपालिकेतील घोटाळा उघड करत दिला दणका; पालकमंत्री विखेंच्या कार्यालयाला आली जाग खासदार संजय राऊत यांनी अहिल्यानगर महानगरपालिकेतील घोटाळा उघड करत दिला दणका; पालकमंत्री विखेंच्या कार्यालयाला आली जाग
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी अहिल्यानगर महानगरपालिकेतील घोटाळा उघड केल्यानंतर नगर जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे....
IND Vs ENG 3rd Test – सामना जिंकूनही इंग्लंडला ICC ने ठोठावला दंड, WTC गुणतालिकेतही बसला फटका
मी पुन्हा येईन! समारोपाचे अंबादास दानवे यांचे जोरदार भाषण
Nanded News – जम्मू काश्मीरच्या राज्यपालांनी राजीनामा द्यावा, पहलगाम हल्ल्यावरून ओवेसी यांची मागणी
बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर चिंता करु नका, रामदेव बाबांनी सांगितला सोपा उपाय
Nanded News – वंचित बहुजन आघाडीच्या युवा आघाडीतर्फे आमदार हेमंत पाटील यांच्या प्रतिमेला जोडे मारले; अर्बन नक्षलवादाच्या वक्तव्याचा निषेध
विठ्ठल चरणी भाविकांचे भरभरुन दान; देवाच्या खजिन्यात 11 कोटी जमा, गेल्यावर्षीपेक्षा 2 कोटींची वाढ