देवाभाऊंच्या राज्यात ना कायदा ना सुव्यवस्था; दादा भुसे यांच्या पोलीस ऑपरेटरचा कारनामा, खंडणीसाङ्गी पान टपरीवाल्याचे अपहरण

देवाभाऊंच्या राज्यात ना कायदा ना सुव्यवस्था; दादा भुसे यांच्या पोलीस ऑपरेटरचा कारनामा, खंडणीसाङ्गी पान टपरीवाल्याचे अपहरण

राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयातील पोलीस ऑपरेटर चंद्रशेखर दराडे याने अन्य तिघांसह एका पान टपरीवाल्याचे अपहरण करून खंडणी उकळली आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर दराडेसह गुह्यातील अन्य पोलीस अंमलदारावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

अंधेरी पश्चिमेकडील एस.व्ही. रोडवर अकबर शेख याची पान टपरी असून ती मोहम्मद अरीफ खान हा चालवतो. गेल्या आङ्गवडय़ात आर्टिगा कार त्या पान टपरीसमोर येऊन उभी राहिली. त्यातून दोघे उतरले आणि त्यांनी स्वतःची ओळख ‘फूड डिपार्टमेंटचे पोलीस’ अशी करून दिली. तू गुटखा विकतोस असे सांगत दोघांनी आरीफला कारमध्ये बसवले आणि ते त्याला घेऊन गेले. कारमध्ये आरीफ वगळता अन्य चार जण होते. कार सुरू झाल्यावर त्यातील दोघांनी आरीफकडे पैसे मागण्यास सुरुवात केली. मित्राकडे 30 हजार रुपये मागून आरीफने स्वतःकडील 10 हजार असे मिळून त्यांना ऑनलाईन 40 हजार रुपये दिले. इतक्यावरच अपहरणकर्ते थांबले नाहीत तर त्यांनी आरीफच्या खिशातील साडेतीन हजार रुपयेदेखील काढून घेतले. मग त्याला जाऊ दिले. दरम्यान, घरी गेल्यावर आरीफने हा प्रकार मित्रांना सांगितल्यानंतर त्यांनी डी.एन. नगर पोलीस ङ्खाणे गाङ्गून तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास केला असता त्यात चंद्रशेखर दराडे, हेमंत कापसे या दोघा पोलिसांसह सागर वाघ आणि नितीन गाढवे अशा चौघांना पकडले. वाघ हा महाराष्ट्र सुरक्षा बलाचा जवान आहे. या चौघांनी संगनमत करून आरीफ या पान टपरीवाल्याचे अपहरण केले.

दोघांवर निलंबनाची कारवाई

चंद्रशेखर दराडे व हेमंत कापसे या दोघांनाही निलंबित करण्यात आले आहे. चौकशी अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई होईल, असे वरिष्ठ अधिकाऱयाकडून सांगण्यात आले. दराडे आणि कापसे हे सशस्त्र पोलीस मुख्यालयात कार्यरत होते. तेथून दराडे प्रतिनियुक्तीवर संरक्षण व सुरक्षा विभागात गेला. त्याची नेमणूक दादा भुसे यांच्या कार्यालयात ऑपरेटर म्हणून करण्यात आली होती. तर कापसे हा मोटर परिवहन विभागात प्रतिनियुक्तीवर होता.

एनडीपीएसच्या गुह्यात अडकविण्याची धमकी

अपहरण केल्यानंतर चौघांनी आरीफकडे खंडणीची मागणी केली. पैसे न दिल्यास एनडीपीएसच्या गुह्यात अडकवू अशी धमकी आरोपींनी आरीफला दिली होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पनवेलमध्ये शाखाप्रमुखांचा दणदणीत मेळावा; आम्ही लढणार.. आम्ही जिंकणार! शिवसेना नेते अनंत गीते यांचा विश्वास पनवेलमध्ये शाखाप्रमुखांचा दणदणीत मेळावा; आम्ही लढणार.. आम्ही जिंकणार! शिवसेना नेते अनंत गीते यांचा विश्वास
सत्ताधाऱ्यांचे विविध घोटाळे रोज बाहेर येत असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जनताच त्यांना धडा शिकवेल. या निवडणुका आम्ही लढणार...
Air India Plane Crash- विमान कंपनी आणि यूकेच्या लॉ फर्ममध्ये वाद, नुकसान भरपाईच्या नावाखाली अनावश्यक माहिती मागवल्याचा केला आरोप
गिरीश महाजन गुंड टोळ्या चालवतात, त्यांची 100 प्रकरणं माझ्याकडे आहेत! संजय राऊत यांचा गौप्यस्फोट
मराठी संतावर पहिला पाश्चात्त्य चित्रपट; संत सावता माळी यांच्या जीवनावरील चित्रपट येणार भेटीला
Chhatrapati Sambhajinagar Accident – डोळ्याचे पाते लवत नाही तोच भरधाव कारने 6 जणांना उडवले, दोघांचा जागीच मृत्यू
डोंगरात टाकले लाखावर बीजगोळे; पर्यावरण संवर्धनासाठी मान्याचीवाडी ग्रामस्थांचा उपक्रम
घरमालकीणीच्या मृत्यू दिवशीच तिच्या सोन्यावर डल्ला, घरकामगार महिलेला अटक