Pandharpur Wari 2025 – माउलींच्या पालखीचे नेत्रदीपक रिंगण आणि बंधू भेट, संतांच्या पालख्यांचा पंढरपूर तालुक्यात प्रवेश

Pandharpur Wari 2025 – माउलींच्या पालखीचे नेत्रदीपक रिंगण आणि बंधू भेट, संतांच्या पालख्यांचा पंढरपूर तालुक्यात प्रवेश

आषाढ शु. अष्टमीला तोंडले येथून सोहळा निघाल्यावर वाटेत सोपानकाकांच्या पालखीची व माउलींच्या पालखीची बंधू भेट माळशिरस तालुक्याच्या हद्दीत झाली. दुपारच्या भोजनानंतर टप्पा येथे माउलींचा पालखी सोहळा विसावतो. याच वेळेस सोपानकाकाकांचा पालखी सोहळा शेजारून पुढे जातो. सोपानकाकांचा रथ माउलींच्या रथा शेजारी आल्यावर थोडा वेळ थांबतो यावेळी दोन्ही संस्थानकडून परस्परांना नारळ प्रसाद दिला जातो. तत्पुर्वी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे ठाकूर बुवा समाधी येथे नेत्रदीपक गोल रिंगण संपन्न झाले.

माउलीची पालखी वेळापूर येथून प्रस्थान झाल्यानंतर ठाकूर बुवा समाधी या ठिकाणी पालखी पोहचली. या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचा माउली माउली, टाळ मृदुंग च्या जयघोष करीत रिंगण सोहळा पार पडला रिंगण सोहळा पार पडल्यानंतर पालखी पुढे मार्गस्थ झाली. काही वेळातच माळशिरस तालुक्याच्या हद्दीत जेष्ठ बंधू सोपानदेव महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज पालखीची भेट झाली.या दोन पालख्या एकमेकान भेटल्या. या वेळी उपस्थित भाविकांनी विठ्ठल विठ्ठलचा जयघोष केला. माउलीच्या पालखी विश्वस्तांनी सोपानदेव यांच्या मानकरी याना मानाचा नारळ प्रसाद दिला. बंधू भेटीचा भावपूर्ण सोहळा पाहून भाविक सुखावले. पुढे माउलीची पालखी भंडीशेगाव येथे मुक्कमी पोहचली.

जगद्गुरू संत तुकारम महाराज यांच्या पालखीने बोरगाव पालखी मार्गस्थ होत तोंडले बोंडले या ठिकाणी पोहचली. या ठिकाणी पालखीतील सर्व भाविक धावले. तुका म्हणे धावा आहे पंढरीस विसावा या अभंगाप्रमाणे भाविकांनी धावा केला. आणि पालखी पिराची कुरोली येथे मुक्कमी पोहोचली.

यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, पंढपूर तालुक्यात आगमण झाले. या पालख्यांचे पंढरपूर तालुका प्रशासनाच्या वतीने तहसीलदार सचिन लंगुटे, गटविकास अधिकारी सुशील संसारे यांनी स्वागत केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

अकरावी प्रवेश प्रक्रियेत 3 लाख प्रवेश निश्चित अकरावी प्रवेश प्रक्रियेत 3 लाख प्रवेश निश्चित
अकरावी प्रवेश प्रक्रियेत राज्यात आत्तापर्यंत 3 लाख 2 हजार 61 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. यापैकी दोन लाख 31 हजार...
50 लाखांची कॅन्सर निदान व्हॅन 99 लाखांना, भास्कर जाधव यांच्या मागणीनंतर चौकशी
शक्तिपीठ महामार्गातून नेमकी कुणाला ‘शक्ती’ मिळतेय? कैलास पाटील यांचा सवाल  
विक्रोळीच्या जीर्ण जल-मलनिस्सारण वाहिन्या महापालिकेकडे वर्ग करा, सुनील राऊत यांची मागणी
वांद्रे पूर्व स्थानक परिसराच्या विकासासाठी मास्टर प्लॅन तयार करा, वरुण सरदेसाई यांची मागणी
तळीये गावातील सर्व दरडग्रस्त कुटुंबीयांचे पुनर्वसन करा! अंबादास दानवे यांची मागणी  
महाराष्ट्रद्रोह्यांना धडकी भरवणारा उद्या ऐतिहासिक विजयी मेळावा! मराठी माणसाची ठाकरी गर्जना ऐकायला डरकाळी फोडत या, शिवसेना-मनसेकडून संयुक्त टिझर जारी