सोनू सूदचा मदतीचा हात, शेतकऱ्याला बैलजोडी देणार
लातूरच्या हाडोळतीच्या गरीब शेतकऱ्याजवळ कामासाङ्गी बैल जोडी नसल्याने स्वतःलाच नांगराला जुंपल्याचा फोटो ‘सामना’त प्रसिद्ध होताच अभिनेता सोनू सूद याने संबंधित शेतकऱयाला बैलजोडी देणार असल्याचे जाहीर केले आहे.
बैल घ्यायला पैसे नसल्याने अंबादास पवार यांच्यावर स्वतःलाच नांगराला जुंपण्याची वेळ आल्याचा फोटो ‘सामना’मध्ये प्रसिद्ध झाला होता. हा फोटो आणि व्हिडिओ सोनू सूद याच्या निदर्शनास येताच त्यानेदेखील मदतीचा हात पुढे केला. तुम्ही नंबर पाठवा मी बैल पाठवतो, अशी एक्स पोस्ट सोनू सूदने आज केली. या शेतकऱ्याला ट्रक्टर चालवता येत नाही. त्यामुळे बैल पाठवतोय. तोच खरा बळीराजाचा मित्र आहे, असेही त्याने एका पोस्टवरील उत्तरात नमूद केले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List