Pune News – पुण्यात पावसाची जोरदार बॅटिंग, खडकवासला धरणातून 2 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग

Pune News – पुण्यात पावसाची जोरदार बॅटिंग, खडकवासला धरणातून 2 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग

पुण्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असल्याने खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणातून 2 हजार क्यूसेक पाणी सोडले जात असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच नदीकाठी न जाण्याचा आणि नदीपात्रात उतरु नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

खडकवासला धरण परिसरात सतत पाऊस सुरू आहे. यामुळे धरणातील पाणी पातळीत मोठी वाढ होत आहे. यामुळे धरणातून 2 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. पावसाचा जोर लक्षात घेता पाणी विसर्गात वाढ होण्याची शक्यता आहे. परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आला आहे. तसेच जनावरांनाही सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे निर्देश दिले आहेत.

मावळ, लोणावळा, कामशेत आदि भागांतही पावसाचा जोर कायम आहे. आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिर परिसरातील भक्तीसोपान पुलाचे रेलिंग पावसामुळे तुटून वाहून गेले आहे. हवामान विभागाने पुढील 24 तास पुणे आणि सातारा घाट परिसरात ऑरेंट अलर्ट जारी केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;