हिंदुस्थान-पाकिस्तान अणुयुद्ध थांबवलं, ट्रम्पना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळावा; असीम मुनीरने व्यक्त केली इच्छा

हिंदुस्थान-पाकिस्तान अणुयुद्ध थांबवलं, ट्रम्पना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळावा; असीम मुनीरने व्यक्त केली इच्छा

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल पुरस्कार देण्याची मागणी पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरने केली आहे. हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधील अणुयुद्ध थांबवल्याबद्दल ट्रम्प यांना नोबेल शांती पुरस्कार देण्यात यावा, असे मुनीर म्हणाला. व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या अ‍ॅना केली यांनी याला दुजोरा दिला आहे. पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांनी नोबेल शांतता पुरस्कारासाठी ट्रम्प यांच्या नावाची शिफारस केल्याचे केली यांनी सांगितले. यानंतर ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये लंचसाठी मुनीर यांना आमंत्रित केले. व्हाईट हाऊसमधील कॅबिनेट रुममध्ये ही भेट झाल्याचे केली यांनी पुढे नमूद केले.

विश्वगुरू मोदी मागच्या रांगेत!

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थान आणि पाकिस्तामधील संघर्ष शिगेला पोहोचला होता. पहलगाम हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूर राबवत हिंदुस्थानने पाकिस्तान आणि पीओकेतील दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य केले. यानंतर 10 मे रोजी दोन्ही देशात शस्त्रसंधी झाली. यानंतर आपल्या मध्यस्थीमुळे हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धविराम शक्य झाल्याचा दावा ट्रम्प यांनी अनेकदा केला आहे. मात्र हिंदुस्थानने ट्रम्प यांचा हा दावा फेटाळून लावला आहे.

सरेंडर करणार नाही! हल्ला केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील; इराणचा अमेरिकेला गंभीर इशारा

ट्रम्प आणि मुनीर यांच्यातील बैठकीच्या काही तास आधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोनवरून ट्रम्प यांच्याशी संभाषण केले. यावेळी मोदी यांनी हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधील युद्धबंदी बाहेरच्या मध्यस्थीमुळे नाही तर दोन्ही देशांतील सैन्यामधील थेट संवादामुळे थांबल्याचे स्पष्ट केले. तसेच हिंदुस्थानने द्विपक्षीय बाबींमध्ये कधीही तृतीय पक्षाची भूमिका स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही, असे पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांना सांगितल्याचे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;