टेकऑफनंतर तांत्रिक बिघाड, तिरुपतीला जाणारे स्पाइसजेटचे विमान माघारी वळवले

टेकऑफनंतर तांत्रिक बिघाड, तिरुपतीला जाणारे स्पाइसजेटचे विमान माघारी वळवले

टेकऑफनंतर तांत्रिक बिघाड झाल्याने गुरुवारी तिरुपतीला चाललेले स्पाइसजेटचे विमान हैदराबादमध्ये माघारी वळवण्यात आले. यानंतर कंपनीकडून तिरुपतीला जाणाऱ्या प्रवाशांसाठी पर्यायी विमानाची व्यवस्था करण्यात आली. दिवसभरातील विमानातील तांत्रिक बिघाड झाल्याची ही तिसरी घटना आहे. याआधी तांत्रिक बिघाडामुळे इंडिगोच्या दोन विमानांचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.

घटनेनंतर स्पाइसजेटने एक निवेदन जारी करत घटनेची पुष्टी केली. स्पाइसजेटच्या Q400 या विमानाने हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन तिरुपतीसाठी टेकऑफ केले. मात्र टेकऑफनंतर AFT बॅगेज डोअर लाईट अधूनमधून पेटत होती. केबिनमधील दाब संपूर्ण वेळ सामान्य होता. मात्र प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेत वैमानिकांनी हैदराबाद विमानतळवर परतण्याचा निर्णय घेतला. सर्व प्रवाशांना सुरक्षित विमानतळावर उतरण्यात आले. विमानाचे आपत्कालीन लँडिंग झाले नाही, असे स्पाइसजेटने स्पष्ट केले.

इंडिगोच्या दोन विमानांचे आपत्कालीन लँडिंग

तांत्रिक बिघाडामुळे एका दिवसात दोन इंडिगो विमानांना आपत्कालीन लँडिंग करावे लागले. पहिले विमान दिल्लीहून लेहला जात होते, तर दुसरे विमान कोलकाताहून आगरतळाला जात होते. दिल्लीहून लेहला जाणाऱ्या इंडिगोचे 6E 2006 या विमानात गुरुवारी सकाळी टेकऑफनंतर तांत्रिक बिघाड झाल्याने लगेचच दिल्लीला परतावे लागले. तर दुसऱ्या घटनेत आगरतळाला निघालेल्या विमानाला तांत्रिक बिघाडामुळे कोलकाता विमानतळावर परतावे लागले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;