घरी लावा ‘ही’ 5 रोपं, त्वचेपासून आरोग्यापर्यंत मिळतील आश्चर्यकारक फायदे

घरी लावा ‘ही’ 5 रोपं, त्वचेपासून आरोग्यापर्यंत मिळतील आश्चर्यकारक फायदे

झाडे ही आपल्या जीवनाचा आधार आहेत, कारण त्यांच्यामुळेच आपल्याला पृथ्वीवर श्वास घेण्यायोग्य वातावरण मिळते, म्हणून आपण आपले घर आणि आजूबाजूचा परिसर हिरवागार ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यातच अशी काही झाडे म्हणा किंवा रोपं जी आपल्याला आरोग्यासाठी फायदेशीर अशी औषध म्हणून उपयोगी ठरतात. तर तुम्ही घराच्या बाल्कनित औषधी गुणधर्मांनी असलेली ही काही झाडे देखील लावू शकता, जी केवळ त्वचेसाठी फायदेशीर नाहीत तर आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहेत. या वनस्पतींची पाने आणि फुले नैसर्गिक उपाय तयार करण्यासाठी खूप उपयुक्त आहेत. प्राचीन काळापासून ते आपल्या आजी या वनस्पतींपासून उपाय तयार करत आहेत, त्यामुळे नुकसान होण्याची शक्यता नाही.

तसेच काही रोपं घरात लावल्याने घरातील हवा शुद्ध होतात, तर काही अशी झाडे त्यांच्या औषधी गुणधर्मांसाठी ओळखली जातात. जर तुम्हाला त्वचेच्या समस्या किंवा आरोग्याशी संबंधित छोट्या समस्यांपासून मुक्ती मिळवायची असेल, तर निसर्गाने आपल्याला पौष्टिकतेपासून ते औषधांपर्यंत सर्व काही रोपं आणि वनस्पतींच्या स्वरूपात दिले आहे. चला जाणून घेऊया अशी कोणती रोपं आहेत जी तुम्ही तुमच्या घरात नक्कीच लावावीत.

तुळशीचे रोप लावा

प्रत्येक घराच्या अंगणात तुळशीचे रोप असायलाच हवे. सहज उपलब्ध होणाऱ्या या वनस्पतीला आयुर्वेदात खूप खास मानले जाते. तुळशीमध्ये अनेक सूक्ष्म पोषक घटक तसेच पॉवरफुल संयुगे असतात. तुळशी त्वचेसाठी देखील वरदान आहे. त्याची पेस्ट चेहऱ्यावर लावल्याने जुने डाग आणि मुरुमे देखील कमी होतात.

कोरफड देखील उपयुक्त

तुम्ही जर घरी कोरफड लावली असेल तर ते केवळ हवा शुद्ध करण्यास मदत करत नाही तर तुमच्या त्वचेसाठी आणि केसांसाठी देखील फायदेशीर आहे. तसेच दुखापतीच्या वेदना आणि सूजवर कोरफडीचा गर गरम करून लावल्यानंतर लगेच आराम मिळतो. कोरफडीच्या गराचे सेवन केल्याने रक्तातील साखर नियंत्रित होण्यास मदत होते.

कढीपत्त्याचे रोपं

तुमच्या घरात कढीपत्त्याचे रोपं लावा. कढीपत्ता हा अनेक पदार्थमध्ये वापरला जातो.तसेच हे कढीपत्त्याचे रोपं इतर अनेक प्रकारे उपयुक्त आहे. दररोज सकाळी कढीपत्त्याचे पान चघळणे केस आणि त्वचेसाठी फायदेशीर आहे, तर त्याची पेस्ट चेहऱ्यावर लावल्याने मुरुमे कमी होतात आणि त्वचा स्वच्छ होते. हे पान रक्तातील साखर नियंत्रित करण्यास देखील उपयुक्त आहे.

पुदिन्याचे रोप

पुदिन्याचा वापर एक औषधी वनस्पती म्हणून केला जातो. उन्हाळ्यात पुदिना खूप उपयुक्त आहे, कारण यांच्या सेवनाने शरीराला थंडावा मिळतो. तसेच तुमची त्वचा ताजी ठेवण्यास देखील उपयुक्त आहे. कारण त्यात अनेक अँटीऑक्सिडंट्स असतात जे मुरुमे कमी करण्यास आणि डाग हलके करण्यास मदत करतात, म्हणून तुम्ही तुमच्या घरात नक्कीच पुदिन्याचे रोपं लावावा.

लेमनग्रास लावा

तुम्ही कुंडीत लेमनग्रास देखील लावू शकता. त्यात अँटी-फंगल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आहेत जे त्वचेला संसर्गापासून वाचवण्यास मदत करतात. तुम्ही लेमनग्रास वेगवेगळ्या प्रकारच्या फेस पॅकमध्ये वापरू शकता आणि त्याचा रस थेट चेहऱ्यावर लावणे देखील फायदेशीर आहे.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

घरमालकीणीच्या मृत्यू दिवशीच तिच्या सोन्यावर डल्ला, घरकामगार महिलेला अटक घरमालकीणीच्या मृत्यू दिवशीच तिच्या सोन्यावर डल्ला, घरकामगार महिलेला अटक
घर मालकीणीचे निधन झाल्यानंतर अंत्यविधीची तयारीही सुरू झाली. हीच संधी साधून घरकाम करणाऱया महिलेने घरमालकीण व तिच्या सुनेच्या दहा तोळ्यांच्या...
शक्तिपीठ महामार्ग – जमिनीच्या सर्वेक्षणासाठी आलेल्या पथकाला शेतकऱ्यांनी परत पाठविले, फुलचिंचोलीतील शेतकरी आक्रमक
अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी सोलापूर मनपाचे पाऊल; बांधकाम परवानगीवेळी ‘प्लिंथ इंटिमेशन’ बंधनकारक
राजकीय भविष्य संपणार म्हणून मिंधे गटाच्या पोटात भीतीचा गोळा, संजय राऊत यांनी फटकारले
तालिबान सरकारला पाठिंबा देत रशियाने घेतला ऐतिहासिक निर्णय! अफगाण दूतावासावर फडकला नवा ध्वज
“हिंदुस्थानचा ‘विकास’ विदेशात फिरतोय अन्…”, वाराणसीतील विहिरीएवढा खड्डा दाखवत संजय राऊतांचा मोदींना टोला
इंडियन बँकेचा ग्राहकांना दिलासा