मोठी बातमी! आता HIV ला थांबवता येणार, एका इंजेक्शनचे 2 डोस घेताच…

मोठी बातमी! आता HIV ला थांबवता येणार, एका इंजेक्शनचे 2 डोस घेताच…

HIV Preventiv Drug : एचआयव्ही हा असा व्हायरस आहे, जो एकदा का रक्तात मिसळला की त्यापासून सुटका होत नाही. या विषाणूमुळे एड्स हा आजार होतो. या विषाणूला पूर्णपणे मारणारं अजून कोणतंही औषध सापडलेलं नाही. तसेच या विषाणूपासून बचाव व्हावा यासाठी अद्याप कोणतीही लस तयार करण्यात यश आलेलं नाही. मात्र या विषाणूला बऱ्यापैकी रोखून ठेवणारे एक इंजेक्शन आले आहे. या इंजेक्शनला अमेरिकेने मंजुरी दिली असून एड्सविरोधी लढ्यात हे मोठं यश मानलं जात आहे.

एचआयव्हीपासून बचाव करता येऊ शकतो

मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकेच्या एफडीएने नुकतेच लेनाकॅपाव्हीर (Lenacapavir) या औषधाला प्री- एक्स्पोझर प्रोफायलॅक्सिस (एखाद्या आजाराच्या संपर्कात येण्याआधीच त्या आजाराविरोधात सुरक्षा प्रदान करणे) म्हणून मंजुरी दिली आहे. हे औषध इंजेक्शनच्या रुपात घेता येणार आहे. प्रत्येक सहा महिन्याला हे इंजेक्शन घेतल्यास एचआयव्हीपासून बचाव करता येऊ शकतो. या इंजेक्शनपासून एचआयव्ही पासून बचाव होत असला तरी तो एचआयव्हीवरील उपचार नाही. हे इजेक्शन घेलत्यानंतर एचआयव्हीला रोखता येतं. जे लोक एचआयव्हीचा संसर्ग असलेल्यांच्या संपर्कात आलेलेनाहीत, त्यांचीच हे इंजेक्शन सुरक्षा प्रदान करू शकते.

HIV विषाणू शरीरात दाखल झाला की…

तज्ज्ञांच्या मते हे इंजेक्शन HIV व्हायरसला शरीरात येण्यापासून रोखू शकते. मात्र ही काही लस नाही. एकदा हा HIV विषाणू शरीरात दाखल झाला की त्यानंतर लेनाकॅपाव्हीर हे इंजेक्शन एचआयव्ही व्हायरसशी लढा देऊ शकत नाही.

प्रयोगात काय सिद्ध झालं?

या इंजेक्शनवर मंजुरीआधी संशोधन करण्यात आले होते. यावर एकूण तीन ट्रायल घेण्यात आले. प्रयोग केल्यानंतर ज्या महिलांनी हे इंजेक्शन घेतले होते त्यांचे एचआयव्ही विषाणूपासून 100 टक्के रक्षण झाले. तर हे इंजेक्शन घेतलेल्या एकूण पुरुषांपैकी फक्त 0.1 टक्के पुरुषांमध्ये एचआयव्हीचे संक्रमण दिसून आले. या संशोधनाला न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडीसीनमध्ये प्रकाशित करण्यात आले.

दरम्यान लेनाकॅपाव्हीरचे एकदा इंजेक्शन घेतल्यावर तो शरीरात सहा महिन्यांपर्यंत सक्रीय असतो. सहा महिन्यांनंतर पुन्हा नवा डोस घ्यावा लागतो. हा डोस घ्यायचा असेल तर प्रत्येक सहा महिन्यांनी एचआयव्ही टेस्ट करणे गरजेचे आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;