एसंशिं गटाचे अघोरी उद्योग कुणासाठी… संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना केलं सावध

एसंशिं गटाचे अघोरी उद्योग कुणासाठी… संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना केलं सावध

शिंदे गट अघोरी विद्येतून निर्माण झालेला आहे. धर्मश्रेत्रात अघोरींचा एक गट असतो तसा सामाजिक, राजकीय क्षेत्रातही असतो. त्यांच्याकडे फार गांभीर्याने पाहण्याची गरज नाही. कारण दिवस-रात्र ते अघोरी विद्येत गुंतलेले असतात. दुसऱ्यांचे किंवा राज्याचे नुकसान कसे होईल आणि माझा कसा फायदा होईल यात ते गुंतलेले असतात. ही अंधश्रद्धा असली तरी दुर्दैवाने महाराष्ट्रात जे आम्ही पुरोगामी म्हणून मिरवतो त्या आमच्या पुरोगामीपणाला डाग लावणारे कृत्य समोर येत आहेत. अशा लोकांच्या हातात महाराष्ट्राचे राजकारण गेले असेल तर हे शाहू, फुले, आंबेडकर, प्रबोधकार ठाकरे यांच्या महाराष्ट्राचे हे कमालीचे दुर्दैव आहे. अशा कोणत्या प्रकारचे लोक फडणवीस यांच्या कॅबिनेटमध्ये आहेत. फडणवीस यांनी कॅबिनेटच्या बैठकीला बसण्याआधी खुर्चीखाली वाकून पहावे, कारण काहीही होऊ शकते, असे म्हणत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एकप्रकारे सावधच केले. मिंधे गटाचे मंत्री भरत गोगावले यांचा अघोरी पुजा करतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यावर माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला राऊत उत्तर देत होते.

संजय राऊत पुढे म्हणाले की, महाराष्ट्राला काळी फासणारी ही कृत्य आहेत. महाराष्ट्राने अंधश्रद्धेविरुद्ध कायम लढा दिला. महाराष्ट्राला या लढ्यात फार मोठी परंपरा आहे. महाराष्ट्राने धर्मांधतेविरुद्ध लढा दिला. देवेंद्र फडणवीस सध्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. ते जसे मंत्र्यांचे पीए तपासून घेताहेत तसे त्यांनी मंत्री सुद्धा तपासून घेतले पाहिजे. अघोरी विद्येत मग्न असलेले मंत्री महाराष्ट्राचे काय भले करणार? राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एलिमिनेट करून तिथे आमचा नेता यावा यासाठी एसंशिं गटाचे लोक ठिकठिकाणी अघोरी विद्या करत आहेत.

माझा अघोरी विद्येवर विश्वास नाही, मी अंधश्रद्धाळूही नाही. पण याचे व्हिडीओ, छायाचित्र समोर येत असून यावरून कोणत्या मानसिकतेच राज्याचे मंत्रिमंडळ आहे हे दिसते. महाराष्ट्राच्या जनतेच्या कल्याणाशी, प्रश्नाशी, लोकशाहीशी, विचारांशी यांना काही पडलेले नाही. महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर बसलेल्या व्यक्तीला ‘एलिमिनेट’ करून त्या जागी आपला नेता बसावा यासाठी अघोरी विद्या सुरू आहे, असेही राऊत म्हणाले.

शिवसेना ही डरपोकांची संघटना नाही, हा मर्दांचा महासागर आहे! शिवसेनेचं भय सत्ताधाऱ्यांना कायम वाटत आलंय!! – संजय राऊत

मी वारंवार एलिमिनेट हा इंग्रजी शब्द वापरतोय. इस्रायल-इराण युद्धात हा शब्द वापरला गेला आहे. इस्रायलने इराणच्या काही प्रमुख नेत्यांना विविध माध्यमातून एलिमिनेट केले. इराणचे जनरल, डिफेन्स सेक्रेटरी यात आहेत. तसेच एसंशिं गटाच्या लोकांना, मंत्र्यांना या अघोरी उपक्रमाद्वारे भाजपच्या प्रमुख नेत्यांना एलिमिनेट करायचे आहे. मी वारंवार या विषयी बोललो आहे आणि जो प्रकार समोर आला, व्हिडीओ समोर आले हे त्यासाठीच होते. हे वेगवेगळ्या पातळीवर सुरू आहे. साताऱ्यापासून महाडपर्यंत आणि महाडपासून सावंतवाडीपर्यंत माझ्याकडे प्रत्येक गोष्टींचा छायाचित्रण आहेत, असा दावाही राऊत यांनी केला.

रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी भरत गोगावलेंनी केली अघोरी पूजा? Video आला समोर

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुलीने ऐकावं यासाठी राणी मुखर्जी वापरते रिव्हर्स सायकॉलॉजीची ट्रीक; तज्ज्ञांच्या मते ही पद्धत किती सुरक्षित? मुलीने ऐकावं यासाठी राणी मुखर्जी वापरते रिव्हर्स सायकॉलॉजीची ट्रीक; तज्ज्ञांच्या मते ही पद्धत किती सुरक्षित?
बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी केवळ तिच्या दमदार अभिनयासाठीच ओळखली जात नाही तर ती एक समजूतदार आई देखील आहे. ती तिच्या...
बघणारे बघून गेले, मंत्री म्हणून आम्हीच निस्तरणार! कुंडमळा दुर्घटनेनंतर गायब झाल्याने होत असलेल्या टीकेवर अजितदादांची भडास
पाणीपुरवठा विभागाचा खर्च मोठा, उत्पन्न कमी!
झेडपीची जालिंदरनगरची शाळा जगातील सर्वोत्तम 10 शाळांमध्ये; ‘वर्ल्ड बेस्ट स्कूल’ यादीत समावेश
हातात हात, चेहऱ्यावर ग्लो; लंडनच्या रस्त्यांवर बॉयफ्रेंडसोबत गुटरगू करताना दिसली जान्हवी कपूर, चाहत्यानं गुपचूप काढला व्हिडीओ
आळंदीतून आज माउलींचे प्रस्थान!
इराणचा इस्रायलमधील रुग्णालयावर हल्ला, 47 जण जखमी; नेतन्याहू म्हणाले मोठी किंमत चुकवावी लागेल