कॉल आणि इंटरनेट खर्चात आठ टक्क्यांची वाढ, सीएमआयईच्या अहवालातून आकडेवारी समोर

कॉल आणि इंटरनेट खर्चात आठ टक्क्यांची वाढ, सीएमआयईच्या अहवालातून आकडेवारी समोर

सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकोनॉमी (सीएमआयई)ने जाहीर केलेल्या एका अहवालात धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात कॉल आणि इंटरनेटवरील खर्चात आठ टक्क्यांची वाढ झाली आहे. महागाई वाढल्याने टेलिकॉम पंपन्यांनी रिचार्ज प्लान आणि डेटा प्लानच्या किमती वाढवल्याने ग्राहकांना कॉल व इंटरनेटसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागत आहेत. फळे, दूध, अंडे, साखर, दाळींवर होणाऱया खर्चातसुद्धा भरमसाट वाढ झाल्याचे या अहवालात म्हटले आहे. एंटरटेन्मेंटच्या एकूण खर्चात 1.38 टक्के वाढ झाली आहे. आरोग्यावर खर्च करण्यासंबंधी लोकांमध्ये आता जनजागृती पसरली आहे. आरोग्यावरील खर्चाच्या सेवेवर 18.75 टक्के खर्च वाढला असून 2022-23 मध्ये यावरचा खर्च 8.48 लाख कोटी रुपये होता. तो 2023-24 मध्ये 10.07 लाख कोटीवर पोहोचला. विमा प्रीमियमवरच्या खर्चात 3.39 टक्के घसरण झाली आहे. 2023-23 मध्ये 1.77 लाख कोटी रुपये होता. तो आता 2023-24 मध्ये कमी होऊन 1.71 लाख कोटी रुपये झाला आहे. कार खरेदीसाठी लोकांनी गेल्यावर्षी 2.64 लाख कोटी रुपये खर्च केले होते, तर वर्षभरानंतर 3.26 लाख कोटी रुपये खर्च केले आहेत.

दारूवरचा खर्चही वाढला

या रिपोर्टनुसार, 2023-24 मध्ये लोकांनी 7.29 लाख कोटी रुपये कपडय़ांवर खर्च केले आहेत, तर दारूवर 1.20 लाख कोटी रुपये खर्च केले आहेत. एक वर्षापूर्वी म्हणजेच 2022-23 मध्ये लोकांनी कपडय़ांवर 7.60 लाख कोटी रुपये खर्च केले होते, तर दारूवर 0.95 लाख कोटी रुपये खर्च केले होते. यावरून स्पष्ट होत आहे की, लोकांनी कपडय़ावरचा खर्च कमी केला असून दारूवरचा खर्च वाढवला आहे.

कार खरेदीवरही खर्च वाढला

सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकोनॉमीच्या या रिपोर्टमध्ये 2022-23 च्या तुलनेत 2023-24 मध्ये स्वतःची कार खरेदीला लोकांनी प्राधान्य दिले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुलीने ऐकावं यासाठी राणी मुखर्जी वापरते रिव्हर्स सायकॉलॉजीची ट्रीक; तज्ज्ञांच्या मते ही पद्धत किती सुरक्षित? मुलीने ऐकावं यासाठी राणी मुखर्जी वापरते रिव्हर्स सायकॉलॉजीची ट्रीक; तज्ज्ञांच्या मते ही पद्धत किती सुरक्षित?
बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी केवळ तिच्या दमदार अभिनयासाठीच ओळखली जात नाही तर ती एक समजूतदार आई देखील आहे. ती तिच्या...
बघणारे बघून गेले, मंत्री म्हणून आम्हीच निस्तरणार! कुंडमळा दुर्घटनेनंतर गायब झाल्याने होत असलेल्या टीकेवर अजितदादांची भडास
पाणीपुरवठा विभागाचा खर्च मोठा, उत्पन्न कमी!
झेडपीची जालिंदरनगरची शाळा जगातील सर्वोत्तम 10 शाळांमध्ये; ‘वर्ल्ड बेस्ट स्कूल’ यादीत समावेश
हातात हात, चेहऱ्यावर ग्लो; लंडनच्या रस्त्यांवर बॉयफ्रेंडसोबत गुटरगू करताना दिसली जान्हवी कपूर, चाहत्यानं गुपचूप काढला व्हिडीओ
आळंदीतून आज माउलींचे प्रस्थान!
इराणचा इस्रायलमधील रुग्णालयावर हल्ला, 47 जण जखमी; नेतन्याहू म्हणाले मोठी किंमत चुकवावी लागेल