पंतप्रधान नरेंद्र मोदींचं विधान ‘सितारे जमीन पर’ चित्रपटात, सेन्सॉर बोर्डाने सुचवलेल्या बदलानंतरच मंजूरी

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं विधान ‘सितारे जमीन पर’ चित्रपटात, सेन्सॉर बोर्डाने सुचवलेल्या बदलानंतरच मंजूरी

आमिर खानचा सितारे जमीन पर या हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. या चित्रपटाला सेन्सर बोर्डाने काही बदल सुचवले होते. हे बदल केल्यानंतरच सेन्सर बोर्डाने या चित्रपटाला मंजूरी दिली आहे. या चित्रपटात पंतप्रधान नरेंद्र मोदींचं विधान
असायला हवं असा बदल सेन्सॉर बोर्डाने सांगितला होता. हा बदल केल्यानंतर सितारे जमीन पर चित्रपट प्रदर्शनासाठी मोकळा झाला आहे.

16 जून रोजी सेन्सॉर बोर्डाने सितारे जमीन पर चित्रपट प्रदर्शित करण्यापूर्वी चार बदल सुचवले होते. त्यापैकी मायकल जॅक्सन ऐवजी लव बर्ड्स हा शब्द वापरायला सांगितला होता. दुसरा बदल होता की बिजनेस वुमन ऐवजी बिजनेस पर्सन शब्द करण्यास सांगितले होते. तिसरा बदल म्हणजे जिथे कमळ फुलाचा एक शॉट होता तो हटवायला सांगितला गेला. तर चौथा बदल म्हणजे चित्रपटाच्या मूळ डिसक्लेमर ऐवजी पंतप्रान नरेंद्र मोदी यांनी म्हटलेलं विधान टाकायला सांगितला. निर्मात्यांनी हे बदल केले आणि त्यानंतरच सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला मंजूरी दिली. आता 20 जून रोजी सितारे जमीन पर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;