Intel मध्ये पुन्हा एकदा मोठी कपात, 10 हजारांहून अधिकांना घरचा रस्ता दाखवणार

Intel मध्ये पुन्हा एकदा मोठी कपात, 10 हजारांहून अधिकांना घरचा रस्ता दाखवणार

जगातील सर्वात मोठी चिप बनवणारी कंपनी इंटेल पुन्हा एकदा कपातीचे धोरण राबवणार आहे. इंटेल जुलै 2025 पासून उत्पादन युनिटमधील 15 ते 20 टक्के कर्मचाऱ्यांना आता घरचा रस्ता दाखवणार आहे. या निर्णयामुळे तब्बल 10,000  हून अधिक जणांच्या नोकऱ्या जाणार आहेत. ही कपात कंपनीच्या इतिहासातील सर्वात मोठी मानली जात आहे.

या कपातीचा परिणाम हा प्रामुख्याने इंटेलच्या फाउंड्री विभागावर होणार आहे. या विभागात कंपनीच्या 15 फॅब प्लांट्सचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. यामध्ये फॅक्टरी तंत्रज्ञांपासून ते नवीन चिप्स डिझाइन करणाऱ्या संशोधकांपर्यंत सर्वांचा समावेश आहे. म्हणजेच ही कपात अगदी कनिष्ठांपासून ते वरिष्ठांपर्यंत अशा सर्व विभागांमध्ये केली जाणार आहे.

मुख्य म्हणजे इंटेलने गेल्यावेळी कपात करताना स्वेच्छा निवृत्तीचा पर्याय समोर ठेवला होता. परंतु यंदा मात्र इंटेल कोणालाही स्वेच्छा निवृत्तीचा पर्याय देणार नाही. तसेच कंपनी आता प्रत्येकाच्या कामगिरीवर काटेकोरपणे लक्ष ठेवून कपातीचा निर्णय घेणार आहे. याबरोबरीने ज्यांची आता कंपनीला गरज नाही अशांनाही कपातीला सामोरं जावं लागणार आहे. कंपनी म्हणते की हा निर्णय खूप कठीण आहे, परंतु सध्याच्या आर्थिक परिस्थिती लक्षात घेता हा निर्णय घेणे खूपच आवश्यक आहे.

मार्च 2025 मध्ये आलेले सीईओ लिप-बू टॅन कंपनीत मोठा बदल आणत आहेत. त्यांचा असा विश्वास आहे की, कमी लोकांकडून अधिक आणि चांगले काम करवुन घेतले जाऊ शकते. एप्रिलमध्ये त्यांनी इंटेलमधील कर्मचाऱ्यांमध्ये 20 टक्के कपात करण्याची घोषणा केली आणि आता ही कारवाई फाउंड्री विभागात सुरू करण्यात येणार आहे. ऑगस्ट 2024 मध्ये इंटेलने 15,000 नोकऱ्यांवर गदा आणली होती. तसेच 2025 च्या सुरुवातीला 20% अधिक कर्मचाऱ्यांना कमी करण्याची योजना होती. त्यानंतर आता तिसरी कपात ही प्रामुख्याने कंपनीतील सर्वात महत्त्वाच्या विभागांमध्ये करण्याचे योजले आहे.

तांत्रिक टीममधील प्रगत तंत्रज्ञान, लिथोग्राफी मशीन आणि संशोधनात गुंतलेले आहेत त्यांना सध्या धोका नाही. परंतु ज्यांचे प्रकल्प बंद झाले आहेत त्यांना त्यांच्या नोकऱ्या मात्र जाणार आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;