चाळीशीमध्येही तुम्ही दिसाल तरुण! दररोज हे फळ खायला सुरुवात करा, वाचा याचे खूप सारे फायदे

चाळीशीमध्येही तुम्ही दिसाल तरुण! दररोज हे फळ खायला सुरुवात करा, वाचा याचे खूप सारे फायदे

डाळिंब हे केवळ एक फळ नाही, तर डाळिंब हे आपल्या आरोग्यासाठी फार गरजेचे आहे. फार पूर्वीपासून पारंपारिक औषधांमध्ये डाळिंबाचा समावेश मोठ्या प्रमाणावर असायचा. आधुनिक विज्ञानाने असेही सिद्ध केले आहे की, दररोज एक डाळिंब खाल्ल्याने, आपले आरोग्य सुधारण्यास मदत होते. म्हणूनच आपल्या दैनंदिन आहारात फक्त एक डाळिंब समाविष्ट करणे हे खूप गरजेचे आहे.

डाळिंब आपल्या त्वचेसाठी सुद्धा फार महत्त्वाचे मानले जाते. खासकरुन वाढत्या वयाचा प्रभाव कमी करण्यासाठी डाळिंब फार महत्त्वाची भूमिका बजावते. असं म्हणतात की, डाळिंब खाण्याचे फायदे अनेक आहेत. डाळिंब हे लहानांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकाला काही ना काही आरोग्यवर्धक फायदे देते.

डाळिंब खाण्याचे फायदे

दररोज डाळिंब खाणे किंवा त्याचा रस पिणे आपल्या हृदयासाठी उत्तम मानले जाते.

डाळिंबाचे सेवन केल्याने रक्तदाब कमी होण्यास मोठ्या प्रमाणात मदत होते.

डाळिंबामुळे आपल्या हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रणालीतील ऑक्सिडेटिव्ह ताण कमी होतो, त्यामुळे आपल्या धमन्यांचे संरक्षण होते.

डाळिंबाचा रस पिल्यामुळे कोलेस्टेरॉल कमी होते, तसेच रक्तवाहिन्यांमधील चरबी वाढण्यास प्रतिबंध होतो.

डाळिंब अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असते, म्हणूनच दररोज सेवन केल्यावर कोलेजनच्या निर्मितीला चालना मिळते. त्यामुळे आपली त्वचा अधिक तरुण तेजस्वी दिसू लागते.

दररोज डाळिंब खाल्ल्याने मेंदूचे कार्य सुधारते आणि स्मरणशक्ती वाढते. डाळिंब खाल्ल्याने चयापचय वाढते, तसेच आपली स्मरणशक्ती सुधारते.

डाळिंब खाल्ल्याने आपले पचन आरोग्य सुधारण्यास मदत होते. डाळिंबाचा रस प्यायल्याने आतड्यांचे आजार बरे होण्यास सुरुवात होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;