बलुच लिबरेशन आर्मीचा पाकड्यांना पुन्हा दणका; आयएसआय एजंट बाबुल हस्सानीचा खात्मा

बलुच लिबरेशन आर्मीचा पाकड्यांना पुन्हा दणका; आयएसआय एजंट बाबुल हस्सानीचा खात्मा

बलुच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानला पुन्हा एकदा मोठा दणका दिला आहे. बलुच लिबरेशन आर्मिने आयएसआय एजंट बाबुल हस्सानीचा खात्मा केल्याचा दावा केला आहे. हस्सानी याला त्याच्या गाडीसह उडवून दिले. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने पाकिस्तान आर्मीच्या एका महत्त्वाच्या एजंटचा खात्मा केला आहे. बीएलएने असा इशाराही दिला आहे की जर कोणी पाकिस्तानी आर्मीचा एजंट असेल तर त्याने आत्मसमर्पण करावे अन्यथा त्यालाही मारले जाल.

पाकिस्तानात स्वातंत्र्याची मागणी करणाऱ्या बलुचिस्तान लिबरेशन आर्मी आणि पाकिस्तानमध्ये संघर्ष सुरूच आहे. यात बलुच आर्मीला दररोज मोठे यश मिळत आहे. बलुच लिबरेशन आर्मी (बीएलए) च्या स्पेशल टॅक्टिकल ऑपरेशन स्क्वॉडने (एसटीओएस) क्वेटा येथे एका कारवाईदरम्यान पाकिस्तान आर्मीचा प्रमुख एजंट बाबुल मुहम्मद हस्सानीला ठार मारले. बीएलएच्या सैनिकांनी क्वेटा येथील बरुरी रोडवरील एका स्टॉप एरियामध्ये पाकिस्तानी लष्कराचे एजंट मुहम्मद हस्सानी यांच्या वाहनाला चुंबकीय आयईडीने लक्ष्य केले. या स्फोटात मुहम्मद हसनी यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचा साथीदार मुहम्मद अमीन गंभीर जखमी झाला. आयईडी स्फोटात वाहन पूर्णपणे उद्ध्वस्त झाले.

बाबुल मुहम्मद हस्सानी हा पाकिस्तानी सैन्य आणि त्यांच्या गुप्तचर संस्थांचा प्रमुख एजंट होता. त्याचे जिहादी पथकाचे एजंट जकारिया मुहम्मद हस्सानीशी थेट संबंध होते. मुहम्मद हसनी कलाटमध्ये एका सशस्त्र टोळीचे नेतृत्व करत होता जो शहर आणि आसपासच्या भागात सक्रिय होता. मुहम्मद हस्सानीने एक छळ कक्ष देखील स्थापन केला होता ज्यामध्ये बलुच तरुणांना जबरदस्तीने बेपत्ता करून छळले जात असे. त्याच्या टोळीने अनेक भागात चौक्या उभारल्या होत्या आणि सशस्त्र गस्त घातली होती. बीएलएने इशारा दिला आहे की जे लोक बलुचांविरुद्ध पाकिस्तानी सैन्यासोबत काम करत आहेत त्यांनी बीएलएसमोर शरण जावे अन्यथा त्यांचे हाल मुहम्मद हस्सानीसारखेच होतील.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;