Health Tips : किडनी खराब झाली हे कसं कळतं? कोणत्या ब्लड टेस्ट करणं आवश्यक? जाणून घ्या

Health Tips : किडनी खराब झाली हे कसं कळतं? कोणत्या ब्लड टेस्ट करणं आवश्यक? जाणून घ्या

मानवी आयुष्य हे आरोग्यम् धनसंपदा या श्लोकावरून अधोरेखित होतं. तुम्हाला कसला आजार नसेल तर तुम्ही चांगलं आयुष्य जगता. पण एकदा का आजाराशी सामना पडला तर पूर्ण बरं होण्यासाठी धडपड सुरु होते. मानवी शरीरातील किडनी हा महत्त्वाचा भाग आहे. यामुळे रक्ताभिसरण प्रक्रिया सुलभ होते. शरीरातून विषारी पदार्थ बाहेर काढण्याचं, तसेच पाणी आणि मीठाचं प्रमाण संतुलित राखण्याचं कामं किडनीद्वारे होते. रक्तदाब नियंत्रित करण्याचं कामही किडनीकडूनच होतं. पण सध्याची जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी, मधुमेह आणि उच्च रक्तदाबामुळे किडनीच्या आजारांना सामोरं जावं लागतं. सुरुवातीच्या टप्प्यात किडनी संदर्भातील आजार लक्षात येत नाही. यामुळे वेळोवेळी रक्त तपासणी करणं गरजेचं आहे. वयाच्या चाळीशीनंतर नियमित रक्त तपासणी करणं योग्य ठरतं.

पब्लिक हेल्थ एक्सपर्ट डॉ. समीर भाटी यांच्या मते किडनी खराब असल्याची लक्षणं हळूहळू समोर येतात. सुरुवातीला शरीरात फार काही बदल दिसत नाही. नंतर त्यात वेगाने बदल दिसून येतो. वेळीच त्याचं निदान केलं नाही तर पुढे जाऊन आणखी त्रास वाढू शकतो. पायाला सूज येणे, मूत्रातून फेस येणं तसेच रंग बदलणं, वारंवार लघवीला येणं (खासकरून रात्रीच्या वेळी), थकवा जाणवणे, श्वास घेण्यात अडचण, भूक न लागणे, त्वचेला खाज सुटणे अशी काही लक्षणं दिसून आल्यास डॉक्टरांची सल्ला घेणं आवश्यक आहे. किडनीत काही समस्या असेल तर काही रक्त चाचण्या करणं आवश्यक आहे. डॉ. समीर भाटी यांनी किडनी संदर्भातील काही रक्त तपासण्याची माहिती दिली आहे.

सीरम किएटिनिन टेस्ट : या तपासणीच्या माध्यमातून किडनी कार्य तपासलं जातं. क्रिएटिनिन एक टाकाऊ पदार्थ असून स्नायूंच्या हालचाली दरम्यान तयार होतो. तसेच मूत्रपिंडातून बाहेर टाकला जातो. रक्तातील क्रिएटिनिनची पातळी वाढली तर किडनी निकामी होण्याचे लक्षण असू शकतं.

सामान्य श्रेणी- पुरुषांमध्ये 0.7 – 1.3 मिलीग्राम/डेसीएल आणि महिलांमध्ये 0.6 – 1.1 मिलीग्राम/डेसीएल

ब्लड युरिया नायट्रोजन टेस्ट : युरिया प्रोटीनच्या विघटनानंतर तयार होणारा पदार्थ आहे. या मात्रा रक्तात आढळून येते. जर याची मात्रा वाढली असेल तर किडनी काही समस्या असण्याचे संकेत आहेत.

सामान्य श्रेणी -7 – 20 मिलीग्राम/डेसीएल

ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट टेस्ट : या टेस्टमुळे तुमची किडनी रक्ताभिसरण प्रक्रिया योग्य पद्धतीने करते की नाही याबाबत कळतं. यात क्रिएटिनिन लेव्हल, वय, लिंग आणि वंशाच्या आधारावर कॅलक्युलेट केलं जातं. जीपीआर कमी असेल तर किडनीत काही समस्या असल्याचं ग्राह्य धरलं जातं.

किडनी फंक्शन टेस्ट : या टेस्टमध्ये रक्तातील अनेक पॅरामीटर तपासले जातात. यात क्रिएटिनिन, बीयूएन, यूरिक एसिड याची तपासणी होते. यामुळे किडनीच्या आरोग्याचा अंदाज येतो.

यूरिक एसिड टेस्ट : यूरिक एसिड बाहेर काढण्यास किडनी अकार्यक्षम ठरत असेल. तर त्याचं प्रमाण रक्तात वाढतं. यामुळे मुतखडा होण्याची शक्यता असते.

सामान्य श्रेणी : पुरुषांमध्ये 3.4 – 7.0 मिलीग्राम/डेसीएल, महिलांमध्ये 2.4 – 6.0 मिलीग्राम/डेसीएल

(डिस्क्लेमर: ही माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आली आहे. त्यामुळे आरोग्याशी संबंधित कोणताही बदल करण्यापूर्वी किंवा कोणत्याही आजाराशी संबंधित उपाय करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;