Jalna news देवदर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या कारला अपघात, 8 जण जखमी
छत्रपती संभाजीनगरहून पंढरपूर येथे देवदर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांच्या इर्टींगा गाडीचा डाव्या कालव्याच्या पुलाच्या दुभाजकाला धडकून अपघात झाला. या अपघातात कारमधील 8 जण गंभीर जखमी झाले. दैवबलवत्तर कार कालव्यात न कोसळता पुलाला धडकली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.
28 मे रोजी विष्णू तांबे यांचे कुंटबीय छत्रपती संभाजीनगरहून पंढरपूरला दर्शनासाठी जात असताना वडीगोद्री येथील उड्डाणपूल ओलांडला आणि डाव्या कालव्याच्या पुलाच्या भिंतीला त्यांची कार धडकली. या अपघातामध्ये विष्णू हरीचंद्र तांबे (50),पत्नी सरला विष्णू तांबे (45), आई हौसाबाई हरिश्चंद्र तांबे(70), सासू कौशल्या भिमराव जाधव(70), रा. कडेठाण ता.पैठण, मिरा रमेश लहाणे (40),प्रेरणा रमेश लहाणे (20), सरला विष्णू तांबे (30), भाग्यश्रीबाई कल्याण तांबे(68),वैभव विष्णू तांबे (18), वृषाली विष्णू तांबे, (17 ) हे जखमी झाले आहेत.
पैठण तालुक्यातील तांबे डोणगाव येथील तांबे दाम्पत्य हे मागील काही वर्षांपासून नोकरी निमित्ताने छत्रपती संभाजीनगर येथे वास्तव्यास आहेत. बुधवारी सकाळी तांबे आणि लहाणे दाम्पत्य हे पंढरपूर येथे देवदर्शनासाठी जात असताना धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वडीगोद्रीजवळ पाठीमागून येणाऱ्या भरधाव वाहनाने समोर असणाऱ्या कारला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला.
अपघातांची मालिका थांबता थांबेना..
राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांची मालिका थांबता थांबेना..गेल्या आठ दिवसापासून अंबड तालुक्यातील चौथा अपघात आहे. यात 5 ठार तर 18 जण जखमी झालेले आहेत.
आयआरबी कंपनीकडून दुर्लक्ष…
महामार्गावरील तसेच सेवा रस्त्यावरील खड्डे यामुळे अपघातांच्या प्रमाणात मोठी वाढ झालेली आहे. सेवा रस्त्यावरील व उड्डाण पुलावरील पथदिवे बंद असतानाही ठेकेदार आयआरबी कंपनीकडून दुर्लक्ष होत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List