मायक्रोवेव्ह मध्ये ही कामे अवघ्या काही मिनिटात करू शकते जाणून घ्या सविस्तर

मायक्रोवेव्ह मध्ये ही कामे अवघ्या काही मिनिटात करू शकते जाणून घ्या सविस्तर

आपल्या स्वयंपाकघरात मायक्रोवेव्ह हा खूप गरजेचा झालेला आहे. मायक्रोवेव्हच्या मदतीने आपण बेकिंग, ग्रिलिंग आणि इतर अनेक गोष्टी करत असतो. तसेच बऱ्याचदा मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम केले जाते. मायक्रोवेव्ह वापरण्यास खूप सोपे आहे. मायक्रोवेव्हच्या मदतीने तुम्ही घरी बाजारासारखा केक बनवू शकता. मायक्रोवेव्हचा अधिक चांगल्या प्रकारे वापर करून तुम्ही तुमची मेहनत आणि वेळ वाचवू शकता. असे अनेक उत्तम मार्ग आहेत. मायक्रोवेव्ह वापरता येईल अशा काही खास कामांबद्दल या लेखात जाणून घेऊया.

मायक्रोवेव्ह फक्त एकच नाही तर छोटी कामे करण्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे. 

मायक्रोवेव्हमध्ये फक्त अन्न गरम करता येत नाही तर बटाटेही उकडता येतात. बटाटे एका भांड्यात ठेवा आणि मायक्रोवेव्हमध्ये ठेवा, चार मिनिटे वेळ सेट करा. आपण सहसा बटाटे शिजवण्यासाठी कुकर वापरतो, मात्र यावेळी बटाटा मायक्रोवेव्हमध्ये उकडवण्याचा प्रयत्न करा.

 

मायक्रोवेव्हमध्ये सुकामेवा किंवा सीड्स भाजण्यासाठी मायक्रोवेव्ह देखील वापरू शकता. यासाठी तुम्हाला 30 सेकंदांचा टायमर सेट करावा लागेल.

 

 

रात्रभर फ्रीजमध्ये ठेवलेलं पीठ घट्ट वाटत असेल, तर तीस सेकंदांसाठी टायमर सेट करा आणि पीठ मायक्रोवेव्हमध्ये ठेवा. यामुळे पीठ पूर्णपणे मऊ होइल.

 

Muffins- आता मफिन्स करा घरच्या घरी! बच्चेकंपनीसाठी घरी मफिन्स बनवताना काही महत्त्वाच्या टिप्स

लिंबू आणि संत्री सारखी काही लिंबूवर्गीय फळे थंड असताना त्यांचा रस काढणे कठीण असते. अशा परिस्थितीत, त्यांना 30 सेकंद मायक्रोवेव्हमध्ये ठेवा. यामुळे ते गरम होतील आणि त्यांचा रस अधिक सहजपणे काढता येईल.

 

लसूण सोलणे खूप त्रासदायक होते. मात्र तुम्ही लसूण मायक्रोवेव्हमध्ये 30 सेकंद ठेवले आणि नंतर ते बाहेर काढून सोलले तर त्याची साल अगदी सहजपणे निघून जाते.

 

 

फ्रीजमध्ये ठेवलेले ब्रेड कडक झाला असेल किंवा शिळा झाला असेल तर त्या ब्रेडवर थोडे पाणी शिंपडा आणि नंतर ते फक्त 15 सेकंद मायक्रोवेव्हमध्ये ठेवा. मग पहा, तुमची ब्रेड एकदम ताजी वाटेल आणि खूप मऊही होईल.

 

 

आता पापड तळण्यासाठी तेल वापरण्याची गरज भासणार नाही. पापड मायक्रोवेव्हमध्ये ठेवा आणि दीड मिनिटासाठी टायमर सेट करा. पापड पूर्णपणे भाजून कुरकुरीत होईल.

 

 

कोथिंबीर किंवा पुदिना साठवून ठेवायचे असेल तर, ते उन्हात वाळवण्याऐवजी ते मायक्रोवेव्हमध्ये वाळवू शकता. मायक्रोवेव्हमध्ये 2 मिनिटांसाठी टायमर सेट करून गरम करा. यामुळे ते पूर्णपणे सुकतील आणि कुरकुरीत होतील. त्यानंतर त्यांना कुस्करून एका डब्ब्यात साठवून ठेवा.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

न्यायालयातच पीडितेला प्रपोज, बलात्काराच्या आरोपीची शिक्षा स्थगित; नेमकं प्रकरण काय? न्यायालयातच पीडितेला प्रपोज, बलात्काराच्या आरोपीची शिक्षा स्थगित; नेमकं प्रकरण काय?
सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी एका प्रेमाची दुसरी गोष्ट पहायला मिळाली. लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी असलेल्या आरोपीने न्यायालयात पीडितेला...
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? सुनील तटकरेंचे एक घाव दोन तुकडे, स्पष्टच सांगितलं..
लग्न, फसवणुक आणि षडयंत्र; इंटीमेट सीन्सचा भडीमार आहे या सिनेमांमध्ये
बीडीडी पुनर्विकास प्रकल्पातील घरांचा ताबा देण्यास विलंब का होतोय? आदित्य ठाकरे यांचा म्हाडाला सवाल
रिसॉर्टमधील तंबू कोसळून पर्यटक तरुणीचा मृत्यू, तीन जण जखमी
भरधाव ट्रकची कारला धडक, एकाच कुटुंबातील 5 जण ठार; 8 गंभीर जखमी
अभिनेता गोविंदाची डाळिंब,आंब्याच्या फळबांगाना भेट; शेतकऱ्याचं केलं कौतुक तर गावकऱ्यांशी गप्पा