Elon Musk चा ड्रिम प्रोजेक्ट अयशस्वी, स्पेसएक्सचे जगातील शक्तिशाली रॉकेट कोसळले!
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलोन मस्क यांच्या स्वप्नातील प्रकल्प ‘स्टारशिप’ ने एक नवीन टप्पा ओलांडला आहे. परंतु परतताना सर्वात शक्तिशाली रॉकेटची चाचणी उड्डाण अयशस्वी ठरली आहे. मस्कची कंपनी स्पेसएक्सने बुधवारी (भारतीय वेळेनुसार) पहाटे 5 वाजता त्यांच्या स्टारशिप सुपर हेवी रॉकेटचे चाचणी उड्डाण सुरू केले. या रॉकेटचे हे 9 वे चाचणी उड्डाण होते. दक्षिण टेक्सासमधील बोका चिका बीच येथील कंपनीच्या स्टारबेसवरून हे उड्डाण करण्यात आले होते. स्टारशिप फ्लाइट 9 प्रक्षेपणात, काही काळानंतर स्टारशिपचा ताबा सुटला आणि ते पृथ्वीच्या वातावरणात कोसळले. हवेत स्टारशिप रॉकेट नष्ट होण्याची ही तिसरी वेळ आहे. असे असताना स्पेसएक्सने असा दावा केला आहे की, या काळात स्टारशिप उड्डाणाने अनेक महत्त्वाचे टप्पे पार केले आहेत.
स्टारशिप फ्लाइट 9 ची चाचणी क्रॅश होण्यापूर्वी सुमारे 1.06 तास चालली. ते हिंद महासागरात उतरणार होते, परंतु तांत्रिक बिघाडामुळे हे अभियान यशस्वी होऊ शकले नाही आणि ते अपघातामुळे नष्ट झाले. स्पेसएक्सने सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये या मोहिमेची माहिती दिली. यावेळी स्टारशिपने गेल्या वेळेपेक्षा जास्त टप्पे ओलांडले आहेत, असे त्यात म्हटले आहे. परंतु काही समस्यांमुळे तांत्रिक कामगिरीवर परिणाम झाला. काय चूक झाली याची चौकशी केली जाईल, परंतु एकंदरीत ते पूर्वीपेक्षा चांगले आहे, कारण मागील दोन चाचणी उड्डाणे 10 मिनिटांपेक्षा कमी वेळेत अयशस्वी झाली.
या उड्डाणात स्पेसएक्सने सुपर हेवी बूस्टर आणि शिप 35 चा वापर केला. या रॉकेटमध्ये 33 रॅप्टर इंजिन बसवले आहेत. यावेळी उड्डाणात 29 इंजिन यशस्वीरित्या सुरू करण्यात आली. तसेच, स्टेज सेपरेशनच्या नवीन तंत्र ‘हॉट स्टेजिंग’ची प्रक्रिया देखील पूर्ण झाली. या उड्डाणातून मिळालेले अनुभव भविष्यातील मोहिमांमध्ये अत्यंत उपयुक्त ठरतील असा स्पेसएक्सचा विश्वास आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List