नंदिनी गुप्ताने जिंकले ‘टॉप मॉडेल चॅलेंज,शनिवारी ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धेची अंतिम फेरी
‘मिस वर्ल्ड 2025’ स्पर्धेत हिंदुस्थानचे प्रतिनिधीत्व करणारी नंदिनी गुप्ता ‘टॉप मॉडेल चॅलेंज’ची विजेती बनली आहे. तिने आशिया आणि ऑशिनियाचा पुरस्कार आपल्या नावे केला. एकूणच स्पर्धेत नंदिनीची दमदार वाटचाल सुरू आहे.
नंदिनीचा जन्म कोटा येथे 2004 रोजी झाली. 21 वर्षांच्या नंदिनीने मुंबईत हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले. तिने 2023 मध्ये फेमिना मिस वर्ल्ड मुकुटावर आपले नाव कोरले. बालवयापासूनच तिने मिस वर्ल्डचे स्वप्न पाहिले. 31 मे रोजी होणार्या मिस वर्ल्डच्या अंतिम फेरीपूर्वी नंदिनीने टॉप मॉडेल चॅलेंजमध्ये चमकदार कामगिरी केली. यामध्ये जगभरातील स्पर्धक सहभागी झाले होते. रॅम्पवॉक, स्टायलिंग आदीची परीक्षा घेण्यात आली. यामध्ये नंदिनीने पारंपारिकता आणि आधुनिकतेचे दर्शन घडवले. आपल्या सादरीकरणाने परीक्षक आणि प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List