उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे हाहाःकार, हजारो हेक्टरवरील पिकं झाली आडवी

उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे हाहाःकार, हजारो हेक्टरवरील पिकं झाली आडवी

वादळ आणि अवकाळी पावसामुळे उत्तर महाराष्ट्रातील हजारो हेक्टरवरच्या पिकांचे नुकसान झाले आहे. या वादळी पावसामुळे 33 हजारहून अधिक शेतकऱ्यांना फटका बसला आहे.

5 मे ते 13 मे दरम्यान उत्तर महाराष्ट्रात जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला. या पावसामुळे नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यातील 16 हजार 985 हेक्टरवली पीकं आडवी झाली आहे. दीड हजार गावातील 33 हजार 400 शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार जळगाव जिल्ह्यात 9 हजार 806 हेक्टरवर सर्वाधिक नुकसान झाले आहे. त्यात केळी, कांदा, मका, पपई, ज्वारी, बाजरी या पिकांचा समावेश आहे.

6 हजार 100 हेक्टरवरील केळी, 950 हेक्टरवरील मका आणि 400 हेक्टरवरील पपईचे या पावसात नुकसान झाले आहे. जळकवानंतर सर्वाधिक नुकसान नाशिक जिल्ह्यात झाले असून एकूण 4 हजार 803 हेक्टरवरील पिकं आडवी झाली आहेत. नाशकात दोन हजार हेक्टरवरील कांदा, 400 हेक्टरवरील आंब्यांचे नुकसान झाले आहे. नाशिकमधील 775 जिल्ह्यातील 17 हजार शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तर धुळे जिल्ह्यात 2 हजार 3
48 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी अवकाळीग्रस्त गावांना भेटी दिल्या आणि नुकसानीचा आढावा घेतला. तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी सरकारडे पंचनामा करून मदतीची मागणी केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;