महाडमध्ये ‘तळीये’चा धोका, दरडी कोसळल्या, कोल गाव थोडक्यात बचावले

महाडमध्ये ‘तळीये’चा धोका, दरडी कोसळल्या, कोल गाव थोडक्यात बचावले

22 जुलै 2021 ची काळरात्र.. तुफान कोसळणारा पाऊस, विजांचा राक्षसी कडकडाट, सोसाट्याचे वारे वहात असतानाच महाडच्या ‘तळीये’ गावावर डोंगरकडा कोसळला, अख्खं गाव चिखलात गाडलं गेलं. या दरड संकटात 86 जणांचा बळी गेला. या घटनेला चार वर्षे पूर्ण होत असली तरी अजूनही इतर गावांवर असलेला दरडींचा धोका टळलेला नाही. कोल गावातील गवळवाडीच्या शेजारी असलेल्या डोंगरमाथ्यांवरून मोठमोठे दगड निसटून वेगात गावाच्या दिशेने घोंघावले. सुदैवाने हे दगड गावावर येऊन कोसळले नाहीत. गावातील सामाजिक कार्यकर्ते तुषार पाटील यांनी सोशल मीडियावरून याबाबतची माहिती पोस्ट केली. त्यानंतर प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या मोठमोठ्या दरडींचे छोटे तुकडे करून ते नष्ट करण्यात येतील, अशी माहिती स्थानिक तलाठ्यांनी दिली.

खोपोली काजूवाडीच्या सहकारनगरात दरड कोसळली
खोपोलीतील काजूवाडी सहकारनगर परिसरातील रहिवासी भागात दरड कोसळली. महाकाय दगड आणि मातीचे लोट या परिसरात आल्याने रहिवाशांमध्ये प्रचंड घबराट पसरली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. नगरपालिका प्रशासनाने तातडीने धाव घेऊन दगड आणि माती हटवण्याचे काम सुरू केले. परंतु सहकारनगरावर ज्या टेकडीतून ही दरड कोसळली त्या टेकडीवर अर्धा ढिगारा अद्यापही अडकला असून तो केव्हाही पुन्हा या वस्तीवर कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, खोपोली पोलीस निरीक्षक शीतल राऊत, तहसीलदार अभय चव्हाण यांनी भानवज मस्जिद ते सहकारनगर परिसराला भेट देऊन रहिवाशांना धीर दिला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पहिल्याच पावसात केईएम रुग्णालयात पाणी साचलं, हाय कोर्टाकडून गंभीर दखल, बीएमसीला नोटीस पहिल्याच पावसात केईएम रुग्णालयात पाणी साचलं, हाय कोर्टाकडून गंभीर दखल, बीएमसीला नोटीस
मुंबईमध्ये दोन दिवसांपूर्वी मुसळधार पाऊस झाला, या पावसाचा मोठा फटका हा मुंबईकरांना बसला, पहिल्याच पावसामध्ये मुंबईतील अनेक भागांमध्ये पाणी साचलं....
आम्ही हल्ला करायच्या आधीच हिंदुस्थानने ब्रह्मोस मिसाईलने हल्ले केले, पाकिस्तानी पंतप्रधानांची कबूली
पाकिस्तानच्या विमानतळावर टॉयटेलाही पाणी नाही, अभिनेत्रीने केली स्वतःच्या देशाची पोलखोल
दक्षिण कोरियाच्या नौदलाचे विमान कोसळले, चार क्रू मेंबर्सचा मृत्यू
IMD Monsoon Update : पुढील 48 तास धोक्याचे, आणखी एक मोठं संकट, आयएमडीचा हाय अलर्ट
अरबाज खानला घटस्फोट देण्यापूर्वीच्या रात्री काय घडलं? मलायका अरोराने स्वतः सांगितली संपूर्ण कहाणी
दीपिकाची स्टेज 2 लिव्हर कॅन्सरशी लढाई सोपी नाही; शस्त्रक्रिया ढकलली पुढे