महानायक असून ‘त्या’ अभिनेत्रीसमोर का झुकले अमिताभ बच्चन, 31 वर्षांपूर्वी असं काय झालं होतं?
Amitabh Bachchan: महानायक अमिताभ बच्चन यांना आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक हीट सिनेमे बिग बी यांनी बॉलिवूडला दिले आहेत. पण एक वेळ अशी आली जेव्हा बिग बींना नुकताच बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या अभिनेत्रीची माफी मागावी लागली. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नव्हती तर, 1990 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आशिकी’ सिनेमातील मुख्य अभिनेत्री अनू अग्रवाल होती. नुकताच झालेल्या एका मुलाखातीत अमिताभ बच्चन यांनी माझी माफी मागितली होती… असं वक्तव्य खुद्द अनू हिने केलं आहे.
नुकताच झालेल्या मुलाखतीत ‘आशिकी’ सिनेमाच्या पोस्टरबद्दल मोठी गोष्ट समोर आली. तेव्हा सिनेमाच्या पोस्टरची तुफान चर्चा रंगली होती. कायम पोस्टरमध्ये अभिनेता आणि अभिनेत्रीचा चेहरा दाखवण्यात आला नव्हता. अनूला जेव्हा प्रश्न विचारण्यात आला की, ‘पोस्टरमध्ये चेहरा दाखवण्यात आला नव्हता, यावर तुम्हाला निर्मात्यांचा राग आला नाही का?’
यावर अनू म्हणाली, ‘सिनेमाच्या पोस्टरपेक्षा जास्त मुंबईच्या प्रत्येक गल्लीतील होर्डींगमध्ये माझ्या चेहऱ्याचा क्लोज-अप लावण्यात आला होता.’ बिग बींबद्दल अभिनेत्री म्हणाली, ‘मला अमिताभ बच्चन यांच्यासोबत एका मॅग्जीनसाठी शुटिंग करायची होती. मी सेटवर वेळत पोहोचली होती. पण बिग बींनी पोहोचायला उशीर झाला. सेटवर पोहोचल्यानंतर बिग बींनी माझी माफी मागितली.
‘बिग बी मला सॉरी म्हणाले.. मी त्यांना विचारलं सॉरी कशासाठी? यावर बिग बी म्हणाले, ‘पूर्ण रस्त्यात तुझे बॅनर आहे. त्यामुळे ट्रॅफिक झालं आहे. याच कारणामुळे माझ्या चेहऱ्याचे पोस्टर मुंबईत लावण्यात आले होत. ज्यावर एक टॅगलाईन लिहिली होती. ‘ये चेहरा भीड रोक सकता हैं…’ असं पोस्टरवर लिहिलं होतं.’
‘माझ्या चेहऱ्याबद्दल अनेकांना माहिती देखील होतं. कायम मी आधी मॉडेलिंग देखील करायचे…’ अनू अग्रवाल हिने फक्त ‘आशिकी’ सिनेमाच्या पोस्टरबद्दल नाही तर, सिनेमासाठी मिळालेल्या मानधनाबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं.
अभिनेत्री आजही पूर्ण मानधन मिळालेलं नाही. अभिनेत्री म्हणाली, ‘सिनेमाचं 60 टक्के मानधन मिळालेलं आहे. पण 40 टक्के मानधन अद्यापही दिलेलं नाही आणि मी मागितलं देखील नाही…’ सध्या सर्वत्र अनू अग्रवाल हिची चर्चा रंगली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List