‘मी गरोदर होती आणि नवरा परक्या बाईसोबत…’, अभिनेत्रीने आईच्या विरोधात जाऊन उरकलं लग्न, झाला पश्चाताप
Bollywood Actress Love Life: झगमगत्या विश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या अभिनय क्षेत्रात यशाच्या उच्च शिखरावर पोहचल्या. पण खासगी आयुष्यात त्यांना अनेक वाईट प्रसंगांचा सामना करावा लागला. अशाच एका अभिनेत्रीपैकी एक म्हणजे झीनत अमान. झीनत यांनी अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण लग्नानतंर अभिनेत्रीच्या आयुष्यात अनेक संकटं आली. लग्न आयुष्यातील सर्वात मोठी चुक ठरली… असं वक्तव्य देखील झीनत यांनी केलं होतं.
झीनत अमानने त्यांच्या कारकिर्दीत अनेक हिट सिनेमांमध्ये काम केलं आहे. अभिनेत्री सोशल मीडियावरही उघडपणे तिचे विचार व्यक्त करते. तिने तिच्या लग्नाबद्दल अनेक वेळा खुलासाही केला आहे. तिच्या लग्नाबद्दल तिने सांगितले की, तिला लवकरच कळलं की तिने लग्न करून मोठी चूक केली आहे, परंतु तिच्या मुलांची आणि आजारी पती मजहर खानची काळजी घेण्यासाठी तिला या नात्यात राहावं लागलं.
झीनत यांनी 1985 मध्ये मझर खान सोबत लग्न केलं. आईच्या विरोधात जाऊन झीनत यांनी लग्न करण्याता मोठा निर्णय घेतला. सिंगापूरमध्ये दोघांनी मोठया थाटात लग्न केलं. पण लग्न झीनत यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरली. एकदा मुलाखतीत झीनत यांनी वैवाहित आयुष्याबद्दल धक्कादायक खुलासा केला.
झीनत मुलाखतीत म्हणाल्या, ‘मी गरोदर असताना माझे पती माझ्यासोबत नव्हते. तर ते दुसऱ्या महिलेसोबत होते. जेव्हा मला पतीच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल कळलं तेव्हा मला मोठा धक्का बसला. मुलाच्या जन्मानंतर मला लग्न मोडायचं होतं. पण मला तसं करता आलं नाही…’
पती मझर आजारी असल्यामुळे झीनत यांना तब्बल 12 वर्ष नको असलेल्या नात्यात राहावं लागलं. मजहर खान यांचं निधन 16 सप्टेंबर 1998 मध्ये झालं. आज झीनत बॉलिवूडपासून दूर असल्यातरी चाहते त्यांना विसरु शकलेले नाहीत.
झीनत आता मोठ्या पडद्यावर सक्रिय नसल्या तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी त्या कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतात.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List