युजवेंद्र चहल तिलं असं पाहूच शकणार नाही आणि…, महविशने पोस्ट करताच क्रिकेटर चर्चेत
Yuzvendra Chahal Love Life: भारतीय क्रिकेट संघाचा क्रिकेटपटू युजवेंद्र चहल गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. कोरिओग्राफर धनश्री वर्मा हिला घटस्फोट दिल्यानंतर चहल याचं नाव आरजे महविश हिच्यासोबत जोडलं जात आहे. युजवेंद्र याच्यासोबत नावाची चर्चा होत असल्यामुळे महविश हिच्या चाहत्यांच्या संख्येत देखील मोठी वाढ झाली आहे. आता महविश हिने अभिनय क्षेत्रात देखील पदार्पण केलंय. आता सीरीजमध्ये महविश मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
‘प्यार, पैसा प्रॉफिट’ या सीरीजच्या माध्यमातून महविश अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. 7 मे 2025 रोजी सीरीज ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. सीरीजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. महविशने सोशल मीडियावर ट्रेलर प्रदर्शित केला असून सर्वत्र तिच्या आगामी सीरीजची चर्चा सुरु आहे.
सीरीजच्या एका सीनमध्ये महविश तिच्या को-स्टारसोबत इंटिमेट सीन करताना दिसत आहेत. सीरीजबद्दल सांगायचं झालं तर, सीरीजची कथा अशा एक मुला भोवती फिरत आहे, जो स्वतःच्या प्रगतीसाठी कसलाच विचार करत नाही. यशस्वी होण्यासाठी तो काहीही करायला तयार आहे. त्याला स्वतःची आणि मित्रांची देखील काही काळजी नाही… असं सीरीजमध्ये दाखवण्यात आलं आहे.
ट्रेलर पाहिल्यानंतर अनेकांनी साधला चहल याच्यावर निशाणा
महाविश हिचा ट्रेलप पाहिल्यानंतर अनेकांनी कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहे. एक नेटकरी म्हणाला. ‘चहल भाई 3, 2, 1’ , अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘चहल वाइल्ड कार्ड एन्ट्री करणार…’, अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘चहल भाईने वॉच लिस्टमध्ये टाकलं असेल…’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘युजवेंद्र चहल हे पाहूच शकणार नाही…’ सध्या ट्रेलर चर्चेत आहे.
कोण आहे आरजे महविश?
आरजे महविश हा एक युट्यूबर, कंटेंट क्रिएटर आणि रेडिओ जॉकी देखील आहे. आरजे महविश यूट्यूबवर विनोदी आणि मजेदार व्हिडिओ देखील पोस्ट करत असते. तर महविशने अलीकडेच स्पष्ट केलं होतं की, ती अविवाहित आहे आणि फक्त लग्नाचा विचार करते.
वयाच्या 19 व्या वर्षी महविश हिचा साखरपुडा झाला होता. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. महवीश सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहते देखील तिच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List