Hsc Result मुंबईची हॅटट्रिक, सलग तीन वर्षे निकाल वाढला, कोकण-कन्या सुस्साट
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा राज्याचा निकाल 91.88 टक्के लागला आहे. राज्याच्या निकालात 1.49 टक्के घट झाली असून यंदा परीक्षेनंतर अवघ्या 45 दिवसांत निकाल लागला आहे. यंदाही निकालात मुलींनी आणि नऊ विभागांमधून कोकण विभागाने बाजी मारली आहे. मुलींचा निकाल 94.58 टक्के तर मुलांचा निकाल 89.51 टक्के लागला आहे. राज्यात कोकण विभाग अव्वल ठरला असून 96.74 टक्के निकाल लागला आहे. सर्वात कमी लातूर विभागाचा 89.58 टक्के निकाल लागला आहे. यंदा 92.93 टक्के निकाल नोंदवत मुंबईने निकालवाढीची हॅटट्रिक मारली आहे. मुंबईचा एकूण निकाल वाढला असला तरी प्रथम श्रेणी (60 टक्क्यांहून अधिक गुण) अथवा विशेष प्रावीण्य (75 टक्क्यांहून अधिक गुण) मिळवून उत्तीर्ण होणाऱयांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत खूपच कमी झाली आहे.
संतोष देशमुखांच्या लेकीला 85.33 टक्के
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची लेक वैभवी देशमुखला बारावीच्या परीक्षेत 85.33 टक्के गुण मिळाले आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर देशमुख कुटुंबावर मोठे संकट ओढवले होते. वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी वैभवीने देखील मोर्चांमध्ये सहभाग नोंदवला होता. आज निकाल जाहीर झाल्यानंतर वैभवीने वडिलांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले. आज काwतुक करायला बाबा नाहीत पण त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करत आहे, असे ती म्हणाली.
विभागवार टक्केवारी
कोकण 96.74
कोल्हापूर 93.64
मुंबई 92.93
छत्रपती संभाजीनगर 92.24
अमरावती 91.43
पुणे 91.32
नाशिक 91.31
नागपूर 90. 52
लातूर 89.46
आरुषी सिन्हा 98.17 टक्के गुण मिळवून रुईया महाविद्यालयातून विज्ञान शाखेतून पहिली आली. तिची जुळी बहीण अयातीनेही 95 टक्क्यांसह घवघवीत यश मिळवले. दोघींना उचलून घेत बारावीच्या यशवंत लेकाRनी एकच जल्लोष केला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List