नामों निशान मिटा देंगे! भारतात आता दिसणार नाहीत पाकिस्तानी कलाकार, घेतला मोठा निर्णय
Pakistani Stars Erased From Bollywood: पाकिस्तानी कलाकार माहिरा खान आणि फवाद खान यांनी अलीकडच्या काळात भारताविरोधात अपमानास्पद वक्तव्य केलं. भारताविरोधात वक्तव्य करणं आता पाकिस्तानी कलाकारांना चांगलंच महागात पडलं आहे. त्यांच्या या वक्तव्यांमुळे भारतीय जनतेमध्ये आणि बॉलिवूडमध्ये नाराजीचं वातावरण पसरलं. भारतीय कलाकारांनी माहिरा आणि फवादला चोख प्रत्युत्तर दिलं, मात्र आता त्यांच्याविरुद्ध घेतलेली कारवाई त्यांना आयुष्यभर लक्षात राहील, असं चित्र देखील दिसतं आहे.
फवाद खान आणि माहिरा खान यांच्या हिंदी सिनेमांमधील गाण्यांचे पोस्टर्स होते, त्यावरून त्यांचे फोटो हटवण्यात आले आहेत. ही फक्त एक कारवाई नाही तर, भारतात देशविरोधी वक्तव्य करणाऱ्या कुणालाही सहन केलं जाणार नाही… असं देखील स्पष्ट दिसून आलं आहे.
भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर ‘कपूर अँड सन्स’ आणि ‘रईस’ मध्ये काम केलेले फवाद आणि माहिरा भारत सरकार आणि सैन्याविरुद्ध अपमानजनक टिप्पणी करताना दिसले. या दोन्ही कलाकारा प्रत्युत्तर देत, म्युझिक अॅप्सवरील गाण्यांच्या पोस्टर्सवरून त्यांचे फोटो काढून टाकण्यात आले आहेत.
सांगायचं झालं तर, आधी माहिरा आणि शाहरुख दोघांचे फोटो पोस्टरवर होते, पण आता अल्बमच्या कव्हरवर फक्त किंग खान दिसतो. ‘कपूर अँड सन्स’ मधील फवाद खानवर चित्रित केलेले “बुद्धू सा मन” हे गाणे सध्या भारतात उपलब्ध नाही. पाकिस्तानी कलाकारांचे काही गाणी अद्यापही उपलब्ध आहे. पण त्यांच्यावर देखील बंदी घातली जाऊ शकते… याची शक्यता नाकारता येत नाही.
ऑपरेश सिंदूर…
ऑपरेशन सिंदूरनंतर, भारताने पाकिस्तानला चेतावणी दिली की जर त्यांनी दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवले नाही, तर भारत पुन्हा लष्करी कारवाई करू शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संदर्भात राष्ट्रीय भाषणात स्पष्ट केले की सध्याचा संघर्ष फक्त एक तात्पुरता विराम आहे.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप नागरिकांचा बळी गेला, त्यात 25 भारतीय पर्यटक आणि 1 स्थानिक नागरिकाचा समावेश होता. याचाच बदल म्हणून ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवण्यात आलं.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List