टेंडर पुन्हा काढा, नाहीतर स्थगिती आणू; सर्वोच्च न्यायालयाची MMRDA सह राज्य सरकारला चपराक

टेंडर पुन्हा काढा, नाहीतर स्थगिती आणू; सर्वोच्च न्यायालयाची MMRDA सह राज्य सरकारला चपराक

ठाणे घोडबंदर ते भाईंदर या बोगदा आणि एलिव्हेटेड रस्त्याच्या कामाच्या टेंडरविरोधात एल अँड टीने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना सरन्यायाधीश भुषण गवई यांनी MMRDA आणि राज्य सरकारला फटकारले आहे.”जनतेचे तीन हजार कोटी वाचत असतील तर त्याचा का नाही विचार करायचा. त्यामुळे टेंडर पुन्हा काढा नाहीतर आम्ही त्यावर स्थगिती आणू” अशा शब्दात सरन्यायाधीशांनी राज्य सरकारला चपराक लगावली.

ठाणे घोडबंदर ते भाईंदर या बोगदा आणि एलिव्हेटेड रस्त्याच्या कामासाठी MMRDA ने टेंडर काढले होते. ते टेंडर भाजपला सर्वाधिक 600 कोटींचे इलेक्ट्रॉल बाँड देणाऱ्या मेघा इंजिनियरिंग कंपनीला मिळाले होते. त्या कामासाठी एल अँड टी कंपनीने देखील टेंडर भरले होते. एल अँड टीचे टेंडर हे इतरांच्या तुलनेत तीन हजार कोटी रुपयांनी कमी असतानाही त्यांना हे टेंडर मिळाले नव्हते. त्या विरोधात एल अँड टी कंपनीने न्यायालयात धाव घेतली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;